रे मना!
रे मना!
रे मना !
एकच गोष्ट आपण विसरतो
आपण एकटे आलेले असतो
आपण एकटेच जाणार असतो
जाताना मात्र आपली खूप घालमेल होते ,
का बरे?
आपल्याला इकडचे सर्व खूप भावलेले असते
काही काही सोडायचे नसते
मग आपण असे केले तर
आपण नवनवीन क्षेत्रात
काम करून समाधान मिळवत गेलो तर
कदाचित लोकांना आपण हवेहवेसे वाटू
म्हणजे सगळे आपल्याशी
भावनिक आदरयुक्त स्तरावर सतत जोडलेले असतील
दूर असेल तरी सोबत असतील
मग काहीच सुटायचे शल्य राहणार नाही
फक्त जोडत जाण्याचे कार्य आपल्या हातून होत राहील
एकता आला नी सर्वांना सोबत घेवून चालला
हे काही कमी नाही हे सर्वांना शक्य नाही
पण सर्वांनी प्रयत्न करायला तर जरूर पाहिजे
प्रत्येकाची छटा वेगळी असते
प्रत्येकाचे चित्र आगळे वेगळे होणार, दुर्मिळ असणार
सर्वानाच सर्व सर्ववेळ आवडणे शक्य नाही
पण अनेकांना काही काही आवडेल
आपण सर्वांना आवडू हाच अट्टाहास सोडला पाहिजे
आपले कार्य आपणच महत्वाचे समजून केले पाहिजे
मग
आपण पुढेच जात राहण्यात
खरी गंमत आहे
मागे येणाऱ्यासही ही गंमत
हळू हळू शिकता येईल
आणि
आपले दुःख हळू हळू नक्की कमी होत जाईल
जे विनाकारण आपल्या सोबत
आपणच स्वतःहून विणून घेतलेले आहे.
आपण स्वयं प्रकाशमान होऊ शकत असताना
अंधारात खितपत का पडायचे
आपण कोणाची मशाल होऊ शकत असताना
आपणच काळोख का व्हायचे
मग
फुलवा तो निखारा फुंकर घालून अलगद
घाई नकोच आहे
कणव, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी,
समजूतदारपणा, दूरदृष्टी, स्वप्न
फुलवा त्या एका अंगारातून
हळूवार फुंकर घालत राहा
होय ! फक्त हवा हवी छातीत तुमच्या
तेवढ्या करिता श्वास मात्र घेत राहणे आवश्यक
आणि छातीची कार्यक्षमता वाढावी
म्हणून आनंदी हसतमुख प्राणायामयुक्त जीवन मात्र हवे
नी त्याकरिता नवनवीन विषय शोधत
त्यांचा आस्वाद घेत प्रवास सुरू राहणे आवश्यक ...
किती एकमेकांत गुंतलेले आहे ना हे सर्व ...
अलगद, गुंता सोडवत,
पुढे जात राहणे आवश्यक आहे
हाच मार्ग कितीएक चोखाळतील उद्या
त्यांच्या साठी तुम्ही
ही वाट मळणे आवश्यक आहे
तेव्हा अवसान गाळून बसता येणार नाही
एकच सूत्र
एकच मंत्र
वारंवार जपणे
*कार्य करत जाणे*
गरजवंत तुमच्या मागे येतील
तुमचा हात देणारा आहे
मग काळजी कसली
*तुमचा हात देणारा आहे
मग काळजी कसली*
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा