अंधांदोलन
जनतेला वेठीस धरून केलेल्या कोणत्याही आंदोलनांचा धिक्कार...
जनतेनेच ठरवले वापर कमी करायचा वा टाळायचा तर गोष्ट वेगळी. मग बघा कसे बाराच्या भावात जातात सगळे . नाक मुठीत धरून येतील दिमतीला.
लोकांच्या राज्यात हे वस्तू वितरणात अशी दादागीरी का बरे ?
जनतेला त्रास न देता कोणतेही आंदोलन होत नसते काय ?
प्रत्येक गोष्टीत जनतेलाच त्रास द्यायला हवा का ?
महागाईचा फटका जनतेलाच ?
दुरवस्थेचा फटका जनतेलाच ?
राजकारणाचा फटका जनतेलाच ?
चुलीत घाला तुमचे स्वार्थी राजकारणी तत्वज्ञान ?
जमत नसेल कारभार तर पायउतार व्हा दूर करा घाण...
कुठे तर म्हणे भीकमाग्या कर्जबाजारी कर्ज चुकवू शकत नाही असा माणूस लोककल्याणाच्या सर्व गोष्टी स्वार्थी राजकारण्यांच्या पाठबळाने गैर मार्गाने विकत घेत चाललाय नी तथाकथित लोकनेते म्हणवणारे लोक त्याच्या ताटा खालचे मांजर होऊन त्याचे खरकटे खाण्यात व त्याच्या चोरीत सहभागी होऊन आनंद मानत राजरोस काळे तोंड मिरवत आहेत ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा