जनतेच्या कल्याणाचा मोठा आव आणत मोठमोठी मूल्ये फक्त चर्चा करून काव्यशास्त्रविनोदाचा आधार घेत जमतेला भुलवून, आपल्या ठरलेल्या तंत्रानुसार प्रचंड प्रसिद्धी पावत 

जनतेच्या नजरेत मोठा प्रसिद्ध व्यक्ती होऊन जनतेच्याच उरावर बसणारे कोंडवाड्यातील जनावरांचे स्वातंत्र्य कसे भारी असते हे सांगणारे लोकशाहीचे मारेकरी मार्ग जनतेच्या माथी अवचित पद्धतशीरपणे बसवायचे काही लोकांचे शतकभर कार्यच राहिलेले आहे. लोकशाही मार्गच खरा मानवी मार्ग असताना त्या व्यतिरिक्त मार्गांचा पुरस्कार करून तथाकथितपणे एखाद्या कार्य वा विचारासाठी आयुष्य वेचणारे, आसुरी आनंद मिळवणारे, झाडून सारे  लोक स्वार्थी चोरच नव्हेत काय ? 

    ह्याचा अर्थ एकच आहे त्यांचा मार्गच चुकलेला आहे व तो सुधारताना आपले हसे होईल म्हणून त्याच विचाराला कवटाळून बसतात आणि नवनवीन क्लृप्त्या करून हेच भरकटलेले लोक व त्यांचे म्होरके गट, कंपू जनतेची सतत दिशाभूल करतात.  याकरिता त्याना मानवता विरोधी विचारांच्या लोकांच्या कटकारस्थानयुक्त पद्धतींची साथ वा काहीशी जबरदस्ती वा मिलिभगत असतेच असते. दृश्य स्वरूपात मात्र ते परस्परांचे कट्टर विरोधक असल्याचे लोकात भासवतात. किती मोठे जाळे आहे हे. त्या तथाकथित विचारवंतांना तरी हे केव्हा कळणार ? सुपारी घेतल्यासारखे फक्त आपले नाव व्हावे म्हणून जघन्य विचार जनतेत रुजवायचे अघोरी कार्य हे लोक करत असतात. किती ही लाचारी ! सतत सत्कर्मांचा वा सद्गृहस्थांचा विरोध कररायचा नी आपले भिकारडे स्वार्थी विचार पेरत फिरायचे ... मात्र आधार त्याच सत्कर्मांचा सद्गृहस्थ लोकोत्तर विभुतिंचा आधार मात्र बेमालूम घेऊन त्यांनाच सुरुंग लावायचा. किती किळसवाणे आहे हे .... 

*अँब्रोस चेट्टियार*


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी