कोणत्याही मशिन्स कधीही वाईट नसतात मात्र त्यांचा वापर मानवा द्वारे  चुकीचा केला जाऊ  शकतो ..
तेव्हा एक प्रचंड लोकसंख्येचा देश म्हणून आपली ती (मशिन्स )गरज आहे .. एका निर्णयामुळे पुन्हा किती वृक्ष आणि जंगलांचा कर्दनकाळ यावा ...
त्यामुळे हे अयोग्य आणि अप्राकृतिक तसेच अवैज्ञानिक आहे ..
EVM चा अनैतिक वापर रोखण्या साठी काय करता येईल.  अशा नीतिमत्ता नसलेल्या लोकांनाच कसे सामाजिक बहिष्कार etc .. करून कसे योग्य कडक शासन होईल ..  सुदृढ समर्थ समाज म्हणून या करिता काय करता येईल .. ह्या दिशेने विचार व्हायला हवा .तर आपण उलट विचार करतोय जे त्यांना हवेच आहे ..म्हणजे आपण कोणासाठी करतोय ? हे स्पष्ट व्हावे आणि सुज्ञानी आत्मपरीक्षण करावे आणि जाणत्यांनी समजून जावे की आता हा खेळ खूप झाला ..आपण खोट्याच्या सोबत आहोत आणि उरल्या सुरल्या जनतेला ही दावणीला बांधायचा विडा घेवून उतरलो हे सुस्पष्ट दिसतेय हे जाणून पुढे पाऊल टाकावे ..  
...अनंत अपार कष्ट घेवून त्याग करून समाजवादी लोकशाहीचा पाया घट्ट करत इथवर आणलेल्या आपल्या विराट देशाला साम्यवादी विचारांकडे नेणारे नेते व पुढे सामंतशाहीला बळकट करत एकूण विचारप्रवाहाला पुन्हा आयते  विरोधकांच्या दावणीला नेवून बांधतील ... आणि हे असले दिखावू समाजसेवेचे  कार्य फक्त वेळकाढू पणाचे सिद्ध होईल ..
...तेव्हा फक्त नेहरू गांधींच्या वारशाच्या काँग्रेसचा मूळ विचार मजबूत होवून पुढे जावा या शिवाय देश जनता व मानवते करिता तरणोपाय नाही...
असले  कार्यक्रम अन्यथा फाटे फोडत राहतील, आवश्यक मूळ कार्य क्षीण होत राहील... 🙏🏾
अर्थात् EVM cha गैरवापर करून सत्ताप्राप्ती झाली असली तरी तिला पदच्युत करण्यासाठी काय भक्कम कार्य करता येईल ते पाहायला हवे ..तसेच गैरवापर होऊच देता कामा नये .. तसले तोडीस तोड वैज्ञानिक  लोक आपल्या मातीत नक्की आहेत .. अश्या तरुणांनी पुढे यावे,  आपला देश वाचवावा ही काळाची हाक आहे ..
.....परंतु खरे देशप्रेम पातळ करण्याची सुपारी घेवून लोकशाही विरोधी लोक लोकशाहीचाच वापर करत लोकशाही मोडीत काढत निघालेत..हे अश्या लोकांनी  स्वतः अगोदर जाणावे..
तर आवश्यक मुख्य कार्य सोडून वेगळेच विषय घेवून एखादा देशकार्य करणारा पक्ष व नेता यांना येनकेन प्रकारेण कमजोर करत राहणे म्हणजे योग्य ठिकाणी समर्थपणे उभे न ठाकता पळवाटा शोधून शोधून उर्मट मूर्खपणाने अनैतिक विरोधकांसाठी रान मोकळे करत पळ काढण्यासारखे आहे ..
विचार करा.. जागे व्हा...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी