नीतीमत्ता


एकदा का तुमची वाटचाल स्पष्ट झाली नी 

ती माझ्या वाटेशी फारकत घेणारी असेल 

तर मग मी त्या वाटेला एकदाचा राम राम ठोकून 

माझ्या माझ्या वाटेला परत फिरतो 

कुणासाठी आपण आपली वाट का वाकडी करावी 

केलेला अनुग्रह हाच खूप झाला म्हणावे इतकेच असो ... 

असे असंख्य वेळा घडते. 

माणसातली माणुसकी शोधायची, 

जपायची कीड आपल्यात असते. 

आपल्या वाटेवर पुन्हा कोणी येईल , 

कधीतरी माणुसकीचा झरा आपल्याला सापडेल 

लोकांचे कल्याण करेल त्याला सोबत घेऊन 

आपणही पुढे जात राहू. 

कधी कोणी थिल्लरही भेटेल, 

साळसूदपणाचा आव आणेल 

परंतु कधीतरी त्याचे बिंग फुटेल नी सत्य बाहेर पडेल 

जग हे चलायमान आहे 

काहीच कधीच साठून राहत नाही राहीले नव्हते 

यापुढेही ते साठून राहणार नाही 

थोडा काळ जाऊ द्यावा लागेल 

जे पेरले गेले आहे ते 

उगवल्या वाचून रहणार नाही  

उगवल्या वाचून रहणार नाही

पेरलेले रुजते उगवते फुलते 

नी फळते नी पसरते सर्वदूर 

तुमच्या आमच्या सर्वांच्या आसमंतात 

नी श्वासात भिनते नी मिसळते रक्तात ही 

नी आपलाच अंश बनून मग 

ती आपली ओळख सांगू लागते 

मग मात्र आपण लपवूच शकत नाही आपले तोंड ही

तेव्हा वेळीच जागावे अथवा वेळीच स्वीकारावे 

आपले सत्य आणि चालावी वाट 

आपली आपल्या नीतीने उघडपणे उजळ माथ्याने 

अथवा निर्लज्ज स्वार्थाने प्रेरित आपले पाऊल जाणून असावे 

इतकेच ध्यानी ठेवावे 

आणि जाणून असावे सज्जनांनीही समूळ सबाह्यांतरी 

ठक असले आपल्याच पोटात शिरून उध्वस्थ करणारे 

समाजकंटकच हे गोड गोळीच्या आवरणातून दिलेले जहरच ते आपणच आपल्याला आपलेच स्वत्व नष्ट करावयासाठी तेव्हा ठेवावे सतत नीतीचे डोळे उघडे सदैव सताड नी जागरुक...

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी