सच्चा विरुद्ध नराधम
कुणीतरी पद्धतशीरपणे प्रसिद्ध होतो
मग तो आपला ही आवडता होतो
आपण त्याला फॉलो करतो
मग तो नराधम हळू हळू आपले रंग दाखवतो
तो पर्यंत आपण त्याचा चष्मा वापरायला लागलेलो असतो
आपण त्याच्या सर्वच वक्तव्यावर सहमत असतो वा असल्याचे गृहित धरले जाते
त्याचे आपल्यालाही फारसे काही वाटत नसते
मात्र कुणीतरी नकळत आपल्यालाही फॉलो करत असतो
त्याचे पातक मात्र आपण घेवून जगतो
आपल्या ते गावीही नसते
चुकुन तो जागा झालाच तर आपल्याला प्रश्न करतो किंवा पडलाच तर आपल्यालाही प्रश्न पडू शकतो
नी तसा तो पडलाच तर आपण चाचपतो आपल्याला
तेव्हा पाणी कुठे मुरते आहे ते आपल्याला समजले तर नी त्यावर पश्चाताप झालाच तर सुधारणा सुरू होते
आपल्या कडून नकळत स्वीकारल्या गेलेल्या
अनंत चुका जाणून आपण स्वतः हैराण होत जातो
हे आपण केलेच कसे असा प्रश्न पडतो
आपल्या डोळ्यावरील झापडे किती दुष्टबुद्धी प्रेरित होत्या ते ही कळते
पण आपण आज योग्य मार्ग हरवलेले असतो
अशा वेळी कुणी तो योग्य मार्ग दाखविणाऱ्याला वेड्यात काढते नी पून्हा आपण त्याच सापळ्यात फसण्याची शक्यता असते
काही जागृत लोक, लोकांना जागरूक करण्याचे कार्यही करत असतात परंतु चोरांचाच अधिक सुळसुळाट असलेल्या दुनियेच्या बाजारात खरे आपल्याला फसवे वाटते नी खोटे आकर्षक वाटते
याला उपाय काय ?
तर स्वतःचे आकलन, स्वतःच सतत वाढवत राहणे.. चांगल्या वाईट लोकांची पारख करणे
आणि चुकीला चूक
म्हणणारे लोक सच्चे असतात इतके जाणणे
तेच प्रस्थापितां विरुद्ध उभे ठाकतात, घाबरत नाहीत.
मात्र जे घाबरून त्यांची गाणी गातात, सौम्य वागतात किंवा सच्या विरोधी लोकांच्याच विरोधात उभे राहतात तेच लोक आपल्या मनात सतत बेमालूम विष कालवून समाजात सतत दुफळी माजवून ठेवतात
मात्र स्वतःला महान समजत असतात.
त्यांच्या लेखी जे महान असतात
त्यांचे बिग फुटून ही ते विचलित होत नसतात
याचाच अर्थ
ते सर्व एकाच खेळाचे खेळगडी असतात..
दुष्ट नी क्रूर खेळाचे नराधम खेळगडी...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा