स्वच्छतेच्या अनुषंगाने असा विचार करूया की जरा जावून पाहावे तर .....
...त्या त्या विभातून सकाळी व पहाटे चक्कर मारल्यास सफाई कर्मचारी जीव मेटाकुटीला येईल इतके काम करून सर्व कचरा काढून नेताना दिसतात .. बापरे .... एक दिवस हा sss कचरा तसाच राहिला तरी परिसर दिसेनासे होईल इतका कचरा रोज जमा होत असतो. 🙄 .. कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे तो आहेच ..
तेव्हा जवाबदारी नेते जाहिराती करणारे व सामान्य सर्वांची आहे... पण हे तुम्हा आम्हाला नीट कळेल तो सुदिन... तुमच्या माझ्या सारख्या नागरिकांची प्रवाशांची सर्व कर्मचारी अधिकारी चालक वाहक गिऱ्हाईक दुकानदार सर्वांचीच आहे .. इतका विचार करतोय कोण .. पण तो करायला हवा ...
थोडा कल्पनाविलास करतो
.... तंबाखू गुटखा खावून थुकणाऱ्यास पकडुन एकेक ठिकाण एखाद दिवस स्वच्छ करण्याची सजा दिली तर कसे राहील ??. तसेच गुटखा व तत्सम पदार्थ कंपन्यांचे मालक जाहिराती करणारे आर्टिस्ट hero यांना सफाईला बोलवले तर कसं राहील??? रोज अजय देवगण अक्षय नी शाहरुख त्यांची मुले बायको येतात नी स्टेशनवर झाडू मारतात स्वच्छ करतात धुतात ... त्यांच्या सोबत रोज नागरिक ही सेवा देतात...
खरे तर हेच व्हायला हवे ..
आता वास्तवात येवूया...
सफाई कर्मचारी यांचा सदैव आदर राखला जावा..
त्यांनी काम केले नाही तर शहर बकाल व्हायला किती वेळ लागेल ... 🙄???
त्यांना योजनात्मक अधिकार स्वच्छता वसुली तसेच पावला पावला वर उत्तम सुविधा ही त्यांनी पुरवाव्यात इत्यादी द्यायला हवे .. कसे🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा