रिपोर्ट :
दिनांक 28 मार्च 2023 रोजी
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
द्वारा अंनिस अध्यक्ष ठाणे शहर, माई वंदना शिंदे, यांनी अंनिस सदस्य अजित डफळे यांच्या साथीने चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रम सादर केला. नवी मुंबईतील वाशी येथील मॉडर्न स्कूल मध्ये रयत मिनी गुरूकुल प्रक्ल्पा अंतर्गत कब बुलबुल कॅम्प मध्ये सदर कार्यक्रम झाला.
अवघी 2 ते 4 थी ची ३५० ते ४०० मुले परंतु शिस्त वाखणण्या जोगी होती. मुख्याध्यापक आणि ७, ८ शिक्षकांच्या सुचनांचे तंतोतंत पालन करत रांगेत बसणे आणि शांत चित्ताने कार्यक्रम जागरूकतेने पाहणे असा या वयाला न शोभणारा दुर्मिळ गुण तेथे सहज पाहायला मिळत होता. 'माझ्यासाठी ह्या वर्गा समोर कार्यक्रम सादर करणे हाच मोठा चॅलेंज होता पण अगदी नाव ठेवायला जागा राहिली नाही असे वातावरण तेथे होते' असे माईंनी कार्यक्रमाबाबत सांगताना उद्गार काढले. चिमुरड्या चवथी च्या मुलांनी अनेक प्रश्न विचारून माईंना थक्क करून सोडले. भूत नाही मग देव आहेत का ? असा ही प्रश्न आला तेव्हा माईंनी गाडगेबाबांचा संतांचा देव सांगितला.
*बोंबा मारी...* गाण्याला मुलांनी उत्स्फूर्त शिस्तबध्द प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक वाघ सर आणि शिक्षक वर्गाचे विशेष कौतुक करायला हवे. प्राचार्या भोसले मॅडम यांच्या हस्ते चमत्कारी दीपप्रज्वलनाने 1वाजता आरंभ झालेला कार्यक्रम 3 वाजेपर्यंत सर्वांनी चमत्कारांना प्रतिसाद देत व नंतर शंका निरसन करून घेत सार्थ सफल केला. माईंच्या शिरपेचात चिमुकल्यांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा दिवा लावण्याचे कर्मकठीण कार्याचे मोरपीस सहज खोवले गेले ...अर्थात ह्याचे सर्व श्रेय माईंचे आणि त्यांच्या आदरणिय गुरू, डॉक्टरांचे हे निर्विवाद 🙏🏾 ..
रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार, सदस्य अंनिस.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा