रिपोर्ट:
दिनांक 6 मार्च 2023
वाघबीळ गाव (जुने) घोडबंदर रोड ठाणे पश्चिम.
म. अंनिस ठाणे शहर.
शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनात,
आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी होळी निमित्त म. अंनिस ठाणे शहर शाखे अंतर्गत *होळीची पोळी लहान करा, पुरणपोळी दान करा* या कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रम पार पडला.
मागील मीटिंग मध्ये ठरल्या प्रमाणे आज होळी दिवशी पूरण पोळी संकलन वसंत विहार Voltas co op society येथील रहिवाशी यांनी सामाजिक जाणिवेतून उत्स्फूर्तपणे सहभाग दिला . अंनिस कार्यकर्त्या पुष्पाताई तापोळे यांच्या पुढाकाराने आणि म अंनिस ठाणे शहर शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनात सदर लक्षणीय कार्यक्रम पार पडला . पुरण पोळी संकलन कार्यात माई आणि पुष्पाताईंना अजित डफळे यांचा ही सहभाग लाभला.
सदर संकलित पोळी गरजू लोकांना त्वरित पोच करण्याची जबाबदारी अंनिस कार्यकर्ते अँब्रोस यांनी घेतली. अँब्रोस यांनी आपल्या मित्र दीपक भालेराव पाटली पाडा, यांच्या कडे सदर गोष्टी बद्दल चर्चा केली तेव्हा त्यांचे सामाईक मित्र कन्हैया पाटील यांच्या परिचित वस्तीत कार्यक्रम होऊ शकेल हे समजले व ठरले.
स्थळी डॉक्टर भोसले यांची भेट झाली. ज्यांनी सदर वस्ती वसवण्यास अफाट मेहनत घेतली आहे. त्यांच्या उपस्थितीत कन्हैया आणि त्यांचे सहकारी मित्र कृष्णा यांच्या सोबतीने अँब्रोस अजित आणि माई असे सर्व जण त्या गल्ली बोळातून रात्री नऊ नंतरच्या अंधाऱ्या रात्रीच्या कुठे कुठे आणि काही घरांसमोर प्रकाश होता परंतु अश्या तुटक्या फुटक्या रस्त्यातून वाट काढत. किंचित धडपडत उंच सखल भागातील खड्ड्यातून खडकातून वाट काढत एके घर गाठत भेटतील त्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत कित्येक माउलींनी सद्भावनेने केलेल्या पूरण पोळीचा भेटरुपी प्रसाद देत पुढे जात होतो . अनेक ठिकाणी माईंना थांबण्याचा आग्रह झाला परंतु माईंची जिद्द अतिशय प्रेरणादायी होती त्यांनी सर्व जण जोशात दार ठोठावले लोकांशी संवाद साधणे होळीच्या शुभेच्छा देणे पुरणपोळी देणे असे करत गेले. सणासुदीला गोड पोळीचा प्रसाद भेट म्हणून प्राप्त करणारे चेहरे प्रसन्न आणि हसरे दिसत होते... त्यांना कौतुक वाटत होते. काही लोक त्यांना घरोघरी भेटून शुभेच्छा देत आहेत ही खूप मोठी गोष्ट त्यांना वाटत होती .. चालता चालता सदर भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते ते या सर्व खंद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम आणि पाठपुरावा करून दूर केले ..
स्थळावर विविध कारणांमुळे फोटो घेता आले नाहीत परंतु डॉक्टर भोसले, कन्हैया आणि कृष्णा यांच्या सोबत घेतलेले चित्र येथे देत आहे 🙏🏾
एके काळी साथीच्या रोगाला बळी पडून ओस पडलेला गाव पुन्हा वसवण्याचे कौतुकास्पद कार्य ह्या तरुण मंडळींनी जीव ओतून केले आहे . त्यांचे कौतुक करावे ते कमीच .. 🙏🏾 अश्या योग्य स्थळी समाधानकारक रित्या पुरण पोळी भेट कार्यक्रम ठरल्यापेक्षा मोठा कार्यपूर्तीचा आनंद देवून गेला🙏🏾.
रिपोर्ट : अँब्रोस
म.अंनिस ठाणे शहर शाखा
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा