आपल्या विभागात राहणाऱ्या सर्व पालकांना नम्र निवेदन
आपल्या गल्लीतील खासकरून अनेक मुले घोळका करून पिशव्यांमधे पाणी भरून धावत पळत गल्लीगल्लीतून पळत सुटतात परिणामी कोणालाही धक्का लागू शकतो तसा अनेकदा असा प्रकार घडला ही आहे. मुलांना आता पर्यंत अनेकदा सांगून झाले आहे. आता या पोस्टद्वारे पालकांना जाहीर विनंती करीत आहे. मुलांना काही शिस्त आणि संस्कार देण्याचे सामाजिक दायित्व मी इमानेइतबारे नेहमी निभावित असून आपल्या कडून ही तशी अपेक्षा करतो . ही मुले खेळाखेळात कधी कधी मर्यादा ओलांडत असतात परंतु पालकांकडून योग्य शासन झालेले कधीच पाहायला मिळत नाही . मग समाज निकोप कसा होणार नी मुलांची योग्य दिशेने प्रगती कशी होणार ?
जगभर मानव पाणी टंचाईला तोंड देत असताना पाण्याचा असा अपव्यय आणि प्लास्टिकचा असा अनिर्बंध वापर हे तुमच्या मते जीवनाकरिता मानवते करिता व पर्यावरणा करिता योग्य आहे का याचा विचार करावा ..
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा