*होळीची पोळी लहान करा पोळी दान करा*
कार्यक्रम उत्साहात साजरा.
दिनांक ६ मार्च २०२३.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर शाखेतर्फे
माई वंदना शिंदे शाखाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात
"होळीची पोळी लहान करा पोळी दान करा"
कार्यक्रमाचे नियोजन केले गेले.
दिनांक ६ मार्च २०२३ रोजी सायंकाळी होळी निमित्त
पोळी संकलनाचे काम नेहेमीप्रमाणे अंनिस कार्यकर्ते माई,  पुष्पाताई तापोळे आणि अजित डफळे यांनी ठाणे पश्चिम येथील वसंत विहार को ऑप सोसायटी मधून केले. पोळ्या बनवून  छान पाकिटात घालून सुपुर्द करत  सर्व रहिवाशांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. 
यानंतरचा टप्पा होता संकलित केलेल्या पोषक चविष्ट पोळ्या लगोलग वितरण. त्याची जबाबदारी अंनिस सदस्य अँब्रोस चेट्टियारने स्वीकारली होती. माई आणि अजित पोळ्याघेऊन वाघबिळ नाका घोडबंदर रोड येथे पोहोचले. तेथून अँब्रोसचे मित्र दीपक भालेराव  तसेच कन्हैया पाटील यांच्या मदतीने जुने वाघबिळ गाव येथील वस्तीमधे पोळ्या वितरणाचे ठरले होते त्या बरहुकुम काम झाले. कन्हैया पाटील व त्यांचे मित्र कृष्णा सुर्यवंशी  व तेथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर भोसले यांच्या साहाय्याने रहिवाश्यांना पोळी वितरणाचा कार्यक्रम आखला गेला होता. होळीच्या पोळीची गोड भेट माईं, अँब्रोस आणि अजित यांनी शुभेच्छांसह घरोघरी जाऊन वाटली. रहिवासी आनंदाने उत्साहाने प्रतिसाद देत होते. लहान थोर सर्वांच्याच मनात त्यांच्या भोसले डॉक्टर कन्हैया पाटील कार्यकर्ते यांच्या बद्दल आदर दिसून येत होता.  सदर वस्तीतील लोकांना पिण्याचे पाणी वीज इ. सर्व सुविधा पुरविण्यात कन्हैया पाटील , डॉक्टर भोसले यांचा पुढाकार आहे. अशा प्रकारे दोन सामाजिक कार्य करणारे गट एकत्र सेवा प्रदान करतानाचे दुर्मिळ चित्र दिसले.
रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार,  म.अंनिस ठाणे शहर.

कार्यक्रम उत्साहात साजरा.
दिनांक 6 मार्च 2023
वाघबीळ गाव (जुने) घोडबंदर रोड ठाणे पश्चिम.
म. अंनिस ठाणे शहर.

शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनात,
आज दिनांक 6 मार्च 2023 रोजी होळी निमित्त म. अंनिस ठाणे शहर शाखे अंतर्गत *होळीची पोळी लहान करा,  पुरणपोळी दान करा* या कार्यक्रमाअंतर्गत कार्यक्रम पार पडला.
    मागील मीटिंग मध्ये ठरल्या प्रमाणे आज होळी दिवशी पूरण पोळी संकलन वसंत विहार Voltas co op society येथील रहिवाशी यांनी सामाजिक जाणिवेतून उत्स्फूर्तपणे सहभाग दिला . अंनिस कार्यकर्त्या पुष्पाताई तापोळे यांच्या पुढाकाराने आणि म अंनिस ठाणे शहर शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या मार्गदर्शनात सदर लक्षणीय कार्यक्रम पार पडला . पुरण पोळी संकलन कार्यात माई आणि पुष्पाताईंना अजित डफळे यांचा ही सहभाग लाभला.
सदर संकलित पोळी गरजू लोकांना त्वरित  पोच करण्याची जबाबदारी अंनिस कार्यकर्ते अँब्रोस यांनी घेतली.  अँब्रोस यांनी आपल्या मित्र दीपक भालेराव पाटली पाडा,    यांच्या कडे सदर गोष्टी बद्दल चर्चा केली तेव्हा त्यांचे सामाईक मित्र कन्हैया पाटील यांच्या परिचित वस्तीत कार्यक्रम होऊ शकेल हे समजले व ठरले.
स्थळी डॉक्टर भोसले यांची भेट झाली. ज्यांनी सदर वस्ती वसवण्यास अफाट मेहनत घेतली आहे. त्यांच्या उपस्थितीत कन्हैया आणि त्यांचे सहकारी मित्र कृष्णा यांच्या सोबतीने अँब्रोस अजित आणि माई असे सर्व जण त्या गल्ली बोळातून रात्री नऊ नंतरच्या अंधाऱ्या रात्रीच्या कुठे कुठे आणि काही घरांसमोर   प्रकाश होता परंतु अश्या  तुटक्या फुटक्या रस्त्यातून वाट काढत. किंचित धडपडत उंच सखल भागातील खड्ड्यातून खडकातून वाट काढत एके घर गाठत भेटतील त्या सर्वांना होळीच्या शुभेच्छा देत कित्येक माउलींनी सद्भावनेने केलेल्या पूरण पोळीचा भेटरुपी  प्रसाद  देत पुढे जात होतो . अनेक ठिकाणी माईंना थांबण्याचा आग्रह झाला परंतु माईंची जिद्द अतिशय प्रेरणादायी होती त्यांनी सर्व जण जोशात दार ठोठावले लोकांशी संवाद साधणे होळीच्या शुभेच्छा देणे पुरणपोळी देणे असे करत गेले.   सणासुदीला गोड  पोळीचा प्रसाद भेट म्हणून प्राप्त करणारे चेहरे प्रसन्न आणि हसरे दिसत होते... त्यांना कौतुक वाटत होते. काही लोक त्यांना घरोघरी भेटून शुभेच्छा देत आहेत ही खूप मोठी गोष्ट त्यांना वाटत होती .. चालता चालता सदर भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य होते ते या सर्व खंद्या सामाजिक कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम आणि पाठपुरावा करून दूर केले ..
स्थळावर विविध कारणांमुळे फोटो घेता आले नाहीत परंतु डॉक्टर भोसले, कन्हैया आणि कृष्णा यांच्या सोबत घेतलेले चित्र येथे देत आहे 🙏🏾
एके काळी साथीच्या रोगाला बळी पडून ओस पडलेला गाव पुन्हा वसवण्याचे कौतुकास्पद कार्य ह्या तरुण मंडळींनी जीव ओतून केले आहे . त्यांचे कौतुक करावे ते कमीच .. 🙏🏾 अश्या योग्य स्थळी समाधानकारक रित्या पुरण पोळी भेट कार्यक्रम ठरल्यापेक्षा मोठा कार्यपूर्तीचा आनंद देवून गेला🙏🏾.
रिपोर्ट : अँब्रोस
म.अंनिस ठाणे शहर शाखा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी