रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार
१३मार्च२०२३
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा
अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी डोंबिवलीतील महिलांच्या
मैत्रीमंडळ मंडळातर्फे आयोजित कार्यक्रमात संबोधित केले .. मंडळातील माईंच्या ओळखीच्या श्रद्धा मॅडम यांनी हा कार्यक्रम घडवून आणला.
१३मार्च२०२३ रोजी सायंकाळी ६ ते ८ मध्ये नियोजित
अंनिसच्या चमत्कारातून विज्ञान कार्यक्रम दाखवत असताना मध्यम वयीन ते ज्येष्ठ अशा 40/45 सुशिक्षित महिलांना माई चमत्कारामागील विज्ञान पाहताना आश्चर्य वाटत होते . याचेच माईंना आश्चर्य वाटले .
संस्थेचा हॉल भक्तिभावाने ओतप्रोत होता , भारलेले वातावरण पाहून माईंनी अंधश्रद्धा निर्मूलनकार्यातील अनुभवामुळे सामंजस्यातून सुधारणा करण्याचा विवेकी पवित्रा घेतला आणि विपरीत परिस्थितीतही Ones More मिळवणारा कार्यक्रम सादर केला . बुवाबाजी सारख्या विषयावर मात्र प्रहार अचूक केला , उदासबोध कविता झोकात सादर केली . दर सोमवारी येथील महिला विशेष उत्साहाने एकत्र येतात. आज खूप मोकळी चर्चा सर्वांनी केली. दोन तास वाढवून अडीच तास ६ ते ८:३० करवून घेतलेला , रंगलेला कार्यक्रम सर्व महिला सदस्यांना हवाहवासा वाटला त्यामुळे माईंना पुन्हा संवाद साधण्यासाठी आवर्जुन बोलावले आहे.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा