हृदयस्थलता
हृदयस्थलता
मीss गुंफून कोशs
अंतरी स्थापित.
मीss गुंफून कोशs
आतच स्थापित.
मजला अप्रुप
रंग प्रकाशाचे ना..
मीss गुंफून कोशs
आतच स्थापित.
जन्माचे ना
सुख ते कुणाला
बाळपणीचे
तारुण्याला
कर्ज चुकवुनी
जीवन यापन
पाउल मोजत
आहे जात ... मी....
सुख कल्पावे
कोश विणावे
रेशिम अर्पुन
आपण जावे
पलिकडिल ते
रंग फुलांचे
पाहण्यास मी
काय उरावे
काय उरावे ...मी....
माझे पाउल
कर्तव्याचे
स्वार्थाचे मी
काय स्मरावे
कोपभाजन
तरिही व्हावे
सज्जनास
यातना कठिण.. मी...
हरपले सारे माझे
सारे माझे सारे माझे
तरिही ओंजळ
भरभरूनी
येता जाता
वाटत आहे
वाटत आहे .. मी..
उगाळून मी
जीवन चंदन
दरवळ मागे
ठेव ठेविला
सुख ते सारे
पाउन हरखे
जीवन गाणे
गात गात.. मी...
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा