रिपोर्ट :
२० मार्च २०२३ रोजी सकाळी ठीक १० ते १२ या वेळेत
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा
आणि प्रयास या संस्थेच्या प्रयत्नाने ठाणे मध्यवर्ती कारागृहात चमत्कारातून वैज्ञानिक प्रबोधन आणि जाणीव जागृती कार्यक्रम सादर झाला.
शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी नेहमीच्या दिलखुलास पद्धतीने अंनिस सदस्य पुष्पाताई तापोळे आणि कल्पना चेट्टियार यांच्या साथीने ठाणे सेंट्रल जेल मधील महिला सुधारगृह विभागात कार्यक्रम सादर केला. एकूण १४८ महिला कैदी असलेल्या महिलासुधारगृहाच्या मुख्य अधिकारी जेलरमॅडम यांच्या हस्ते पाण्याचा दिवा लावून उद्घाटन झाले.
नंतर *या आज मिळून सारे हा निश्चय करूया रे* ह्या आरती पासून थेट शेवट पर्यंत कार्यक्रम खूप रंजक झाला. भुताविषयी अनेकांनी प्रश्न विचारले, अंगात येणे काय असते, अचानक यांच्या अंगात एकदम ताकद कशी येते जड वस्तू कसे उचलतात ? इ. या सर्व प्रश्नांविषयी शंका समाधान केले. महिला वर्गाच्या हृदयात कोरलेले गीत *मैं अच्छी हुं घबराऊ नको ऐसा खत मे लिखो..* बऱ्याच जणिंनी सुरात सूर मिळवले.
समाजातील विविध स्तरातून आलेल्या या महिला विविध अनुभवांनी आणि प्रसंगांनी पछाडलेल्या असतात. पुढील मार्गक्रमण करताना त्यांच्या मनातील अनावश्यक जळमटांना दूर करण्याची संधी होती. एक प्रयत्न होता. आणि पुढील उत्तम आयुष्याचा पाया नव्याने रचताना आज त्यांच्या आयुष्यात झालेल्या चुकांसाठी ते प्रायश्चित्तही घेत आहेत. त्यानी मनाने निर्मळ व्हावे, निकोप समाजनिर्मितीच्या कार्यातील एक महत्वपूर्ण व सक्षम असा समाजाचा भाग बनून समाजात पुन्हा सन्मानाने सामावून जावे ह्याकरिताच्या कारागृह म्हणजे सुधारगृह यंत्रणेच्या ह्या प्रयत्नास सलाम. आपल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितिचा वैज्ञानिक जाणीवा प्रबोधनाचा कार्यक्रम म्हणजे ह्या प्रयत्नाला वेग देणारे पाऊल खचितच आहे. या कार्यक्रमाचे जेलर मॅडम यांनी कौतुक केले व सर्व म.अंनिस सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभारपर दोन शब्द व्यक्त केले. जेलच्या गंभीर अशा वातावरणात हे काही क्षण प्रबोधनाचे मार्गदर्शनाचे, विचारांना दिशादेणारे असे होते .
रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार अंनिस सदस्य.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा