"विशेष म्हणजे प्रख्यात रयत शिक्षण संस्थेचा हा उपक्रम आहे .
मूळ रयत संस्थेच्या उभारणीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महान कार्य आहे. महाराष्ट्रभर हे जाळे दिसते. गेले वर्षभर आपण 'ज्यांना अभिवादन म्हणून कार्यक्रम राबवतोय प्रत्यक्ष डॉक्टर एन डी पाटील ' त्यांनी ही अनेकदा सदर शाळेला भेट दिली आहे हे विशष. ही मुळात आपल्या विचारांची शाळा असल्यामुळे खूप मोकळेपणामुळे आणि अधिक उत्साहात इथे सादरीकरण झाले. कुठेही भंपक, दिशाहीन वा अवैज्ञानिक भाव किंवा कृती नाही. कोणत्याही देवतेचा फोटो नाही. कर्मवीर भाउराव पाटील आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीवहिनी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून सुरुवात झाली", माई कालच्या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती पुरवत भरभरून बोलत होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा