उपकार (अर्थात विद्यार्थ्यांचे)

उपकार (अर्थात विद्यार्थ्यांचे)

कितीही स्मरावे करोनी प्रयत्ने
तरीही न सुचले ते कार्य काय व्हावे
हारोनी मग हो किंकर्तव्यविमूढ
स्मार्टफोन घेऊनी सर्च करावे

कित्येक खर्चोनी तास फुकाचे
आठवास पाझर फुटायचे राहावे
विस्मरणात गेलेले कार्य कशाचे
खेळात रंगोनी पुन्हा विसरावे

प्रभाते बळाने शयन त्यागोनी
प्रातर्विधीस जाती  नित्यनेमाने
हट्टाने परी सर्व भावे ते करती
मग पब्जी खेळती अनिर्बंध

छक्के पंजे सर्व गेमचे तोंडपाठ
कालचा गृहपाठ त्यासि आठवेना
घरातील कामे ती नेमेचि विसरती
उगा त्रास चेकिंगचा म्हणे गुरूपालकांना

असे खूप उपकार त्यांचे जगावर
कधी दंभ त्याचा त्यांना नाही झाला
उगा म्हणे कुणाला दुखावित नसती
या इवल्या जगाचा नसती ते प्यादा

जगा नी जगाला जगू द्या हे ह्यांचे ब्रीद
पटेना पालका ब्रेन म्हणे त्यांचे विपरीत
त्रिकाळ खादीचे स्पॉन्सर नाही म्हणोनी
गृहत्यागा' आदेश येता स्वयं शरणागत
  ©अँब्रोस चेट्टियार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी