चिमण चारा वाचून पंडित काकुंस पत्र
एकदम वेगळी भूमिका दिसली या कथेत .. अगदी उलट वाटावी अशी ... सामाजिक जाणिवेने ओतप्रोत तर तुमच्या कथा असतातच ....
....परंतु येथे रूढी परंपरांना निसटता का होईना छेद देण्याचा प्रयत्न प्रकर्षाने दिसला आणि तो स्वागतार्ह आहे.. दिलासादायक आहे लेखक काही पाऊले पुढे गेलेला दिसतोय ..
खूप खूप कौतुक ..
आता तुम्ही आमच्या अंधश्रद्धा निर्मूलन कार्यात हळू हळू थोडा थोडा सहभाग घ्यायला हरकत नाही ..😊😊😊
....थोडे अगोदर ही कथा मिळाली असतो तर चळवळीची मासिक पत्रिका पाठवली असती आपल्या पुस्तका सोबत ...
असो .
त्यातून सत्यघटना समजतात कुठे कोणत्या करायचा सत्कार केला ते कळते अनेक सामाजिक उपक्रम व त्या कार्यकर्त्यांची ओळख होते ... असे खूप काही .. त्या मासिकद्वारे होते..
आवडल्यास..नक्की सभासद व्हा ..कदाचित कधी कधी ते एकांगी वाटेल पण समजस्थितीचे भान ठेवून त्यातील आहे घेत पुढे जायचे ..मी तुम्हाला या वर्षीचा मोबाईल वा कॉम्प्युटर मध्ये वाचता येईल असा वार्षिकांक पाठवतो. वेळ मिळेल तसा जरूर वाचा . 😊🙏
तसाच अंक आणि १० मासिक अंक असे येते ... म्हणजे विशेष वार्षिक अंक अधिक १० मासिकांक आपल्याला अवघ्या नाममात्र ₹२००/- मध्ये प्राप्त होते एक वर्ष भर..
खाली एक स्कॅन code पाठवीत आहे.. विचार झाल्यास यावरून सभासद होता येईल ..
ह्या छोट्या वार्तापत्र सभासद रकमेने एका सामाजिक चळवळीला हातभार ही नकळत लागेल ...
आणि हो त्यासोबतच.. आपल्या सोसायटीत वगैरे कुठे चमत्कारातून वैज्ञाकनिक जाणीव प्रबोधनाचे कार्यक्रम करावयाचे असेल तर नियोजन करून आयोजित करता येतील 😊🙏
खूप खूप बोललो तुमच्या कथेतील एका धाडसी वळणामुळे ..😊🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा