मोकळे आकाश

महिला दिना निमित्त
रचना सादर समर्पित
समस्त महिलांकरिता
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

मोकळे आकाश

डोके मोकळे ठेवूद्या, 
मर्जीने वागूद्या

ऩका ठेवू ओझे
तुमच्या अज्ञानाचे
अपेक्षांचे
विणून बेमालूम
एखाद्या पगडीआड
पदराआड

राहुद्या मोकळे डोके त्यांचे
त्यांचे त्यांनाच झाकुद्या
त्यांना गरज वाटलीच तर
नी तेव्हा

तोवर त्यांच्या विचारांना
नकाच करू अडसर
भरारी घेण्यापासून
इतक्यात तरी

काढा ते डोई वरचे ओझे
फुलू द्या त्यांना
फक्त तुमची भाऊगर्दी दूर करा
द्या त्यांना मोकळे आकाश
द्या त्यांना मोकळे आकाश.....
  ©अँब्रोस चेट्टियार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी