रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार
१३मार्च२०२३
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा द्वारा
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि महिलांसाठी विशेष कार्यरत *प्रयास* संस्थेतर्फे आयोजित
मुंबई harbour लाईनच्या देवनार स्थित TISS कॅम्पस विभागातील लायब्ररी हॉल म्हणजे ओल्ड कॅम्पस हॉल मध्ये १३मार्च२०२३रोजी दुपारी १२ते२:३० दरम्यान संपन्न झाला.
ठाणे शहर अंनिस अध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या सामाजिक कार्यातील विशेष अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ
समाजातील एका विशिष्ट थरातील म्हणजे वेश्या व्यवसायातील महिलांकरिता ही मिळायला हवा. ह्या विचाराने महिलांच्या प्रबोधनाचा हा कार्यक्रम *TISS आणि प्रयास* तर्फे आखला गेला होता. खरेतर तसे हे अतीशय संवेदनशील असे कार्य होते. रोजच नको नको त्या प्रसंगांना तोंड द्यावे लागत असलेल्या 70/75महिलांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला. त्यांना आपल्या जीवनातील अतीप्रसंगांना तोंड देत जगताना सभ्यसमाजात संकोचून जीवन कंठावे लागते. त्यांना मनमोकळे गप्पांतून चमत्कारातून विज्ञान सांगत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शक सूचना मिळाल्या. तसेच त्यांच्या अपत्यांची आरोग्याची काळजी घेऊन त्यांना सुदृढ समाजातील एक नागरिक बनण्यासाठी उत्तम शिक्षणसंधी करिता योग्य पाऊल उचलणे कसे व किती आवश्यक आहे हे चर्चेतून त्यांना समजले. मुलांसाठी रोजगार काम इत्यादी करिता प्रयाससारख्या संस्था मदत करत असतात. तसेच कोणी महिला ह्या व्यवसायातून बाहेर पडण्यास इच्छुक असते वा प्रयत्न करते तिला सर्वतोपरि सहकार्य ह्या संस्था देतात. तसेच पुनर्वसनाचे कार्यक्रम राबविले जातात. इत्यादिंची थोडक्यात माहिती देण्यात आली. माईंनी आपल्या नेहमीच्या गप्पांतून विषयाला नकळत हात घातला. आपल्या शैलीने महिलांकरिताचा हा विशेष कार्यक्रम करताना सामाजिक सद्भावाच्या जाणिवा जागृत केल्या. अलगद त्यांच्या मनातील कितीतरी अंधश्रद्धांना भुईसपाट केले. महिलांच्या डोक्यास एक सर्वागीण आयुष्य बदलून टाकू शकणारा सकस विचाराचा व्यायाम देण्याचे सफल कार्य केले.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिति ठाणे शहर शाखा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा