रिपोर्ट :
दिनांक :३० मार्च २०२३
स्थळ : किल्ले शिवनेरी
अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या आगळ्यावेगळ्या भेटी गाठी विशेष सदरात मोडणारा आजचा अहवाल हा पूर्णतः भावनिक आणि त्याच वेळी सामाजिक जाणीव रुंदावणारा ठरेल याची खात्री आहे.
म.अंनिस ठाणे शहर अध्यक्ष , ज्येष्ठ सदस्य माई वंदना शिंदे  यांनी म.अंनिस ज्येष्ठ सदस्य श्री अरुण रणदिवे आणि श्रीमती कौसल्याताई रणदिवे यांची भेट घेवून पुढे म.अंनिस ज्येष्ठ सदस्य प्रख्यात चळवळ गीतकार कवी श्री एस. एस. शिंदे आणि श्रीमती सुमनताई शिंदे यांना भेट दिली..  हीच एक पर्वणी होती .. कार्यकर्त्यांची खूप दिवसांची ही भेट खूप जिवाभावाचे संबंध चौकशी विचारपूस आणि खूप गप्पा हा मुख्य कार्यक्रम होता
शिंदे सरांनी पुढचा कार्यक्रम आखला होता शिवनेरी किल्ला भ्रमण आणि शिवनेरी डोंगरातील रम्य लेणी दर्शन असा भरगच्च कार्यक्रम .. परंतु अंनिस कार्यकर्ते आणि सामाजिक विषय अस्पर्शित ? हे होणे नाही...
जवळच्याच दुर्बल घटकातील मुलींसाठी निवासी शासकीय आश्रमशाळा हीच एक अभिनव संकल्पना आहे . ती राबवणाऱ्या  आश्रमशाळेतील शिक्षक शिक्षिका आणि गृहपाल मॅडम यांच्या सहकार्याने आणि शिंदे सरांच्या पुढाकाराने चमत्काराने वैज्ञानिक दृष्टीकोन कार्यक्रमाचे सादरीकरण केले गेले .. दहावी बारावीच्या मुली परीक्षा आटोपल्यामुळे नुकत्याचा कुटुंबाकडे रवाना झाल्या होत्या .. उर्वरित पैकी पाचवी ते अकरावीच्या सर्व मुली कार्यक्रमास उपस्थित होत्या .. अनेक प्रश्नाचे कोडे सुटत होते .. खूप चमत्कारांचे सादरीकरण करता आले नाही तरी व्याख्यान रूपाने आणि चर्चारूपाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार प्रसार करण्यात हातखंडा असलेले शिंदे सर आणि माई यांनी उत्तम सादरीकरण केले..सर्व उपस्थित शिक्षक आणि सुमारे ३००विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचा लाभ घेतला ..प्रश्न ही विचारले त्यांच्या शंका निरसनाचाही विशेष लाभ त्यांना झाला पालकांपासून , घरापासून दूर राहताना अनेक प्रश्न या मुलींमध्ये उद्भवतात त्यातील काही आज नक्की सुटले होते ..
...व्याख्यान सादरीकरण कार्यक्रमाचे आणि दुर्ग भ्रमण तसेच लेणी दर्शन इ...चे चित्रण करण्याचे मोठे आवश्यक  तसेच अविस्मरणीय कार्य रणदिवे सरांनी पार पाडले..  सदर कार्यक्रमात आणखी एक विशेष महत्वाचे म्हणजे ज्येष्ठ कार्यकर्ते शिंदे सर , रणदिवे सर,  सुमनताई   कौसल्याताई, माई आणि गृहपाल मॅडम म्हणजे पुरुषांच्या पेक्षाही जास्त महिलांनी विचारपिठावर स्थान स्वीकारून मुलींना एक सकारात्मक सामाजिक संदेश , एक विशेष विचार दिला ..महिला सर्वच क्षेत्रात आज आघाडीवर आहेत.. तेव्हा शिक्षण घेवून आपल्या आवडत्या क्षेत्रात आपण स्वतःला घडवू शकतो हा विश्वास त्यांना दिला ... अंनिस कार्यकर्त्यांनी साध्या स्नेहभेटीच्या कार्यक्रमाचे रूपांतर सामाजिक संदेशात केले आणि भेट अनेकानेक अर्थाने सार्थक केली.. 
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती.
रिपोर्ट : अँब्रोस चेट्टियार
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी