स्त्रीपुरुष

स्त्रीपुरुष भेदअभेद


नर, मादीच्या आयुष्यात 

कायम शेवट म्हणूनच उगवत असतो 

निदान ज्ञात इतिहासात तरी तो तसाच दिसतो ...

तिची तीच जीवनगाणे गाते 

तिची तीच पर्वतासम विशालकाय होते 

नी अडवते पुरुषालाच वाहून जाण्यापासून सुद्धा ...

हो हो कायम फक्त नावाच्या पुरुष 

परंतु मुळातल्या अंता साठी,

मुळातल्या मरणासाठी...


त्याला ? ती भाळते, भाळते

गुंतते पुरती त्याच्यात ती 

त्याचीच होते 

समर्पित होते त्याला..

आपली उंची त्याला देते..

आपले गांभीर्य त्याला देते 

आपली मोठेपण त्याला देते 

आपली ऐश्वर्य त्याला देते 

आपली खोली त्याला देते 

आपली भव्यता त्याला देते

नी त्याला अमर्याद करते

त्याला मोठे करते 

त्याला शहाणे करते , 

आणि फसते इथेच ती...

तो तिला नाडतो, गंडवतो,

गुंगवतो, फसवतो 

पुन्हा पुन्हा नी सतत 

हे सहज जमते त्याला

तीही फसत जाते पुरती त्याला 

उपरती होत नाही तिला.


अगदी थोडेसेच काही काहीच 

सूर्यही असतात धगधगते

आपल्या, तिच्या चंद्राच्या प्रकाशाचे ही 

सोनचांदणे करून थक्क करतात विरळे

तिलाही सूर्य करून एकत्र तळपत राहतात विरळे

जगाने घ्यावे त्यांचे नाव तेव्हा 

पर्यायच राहू नये असा पेच करून ठेवतात 

दोघांचे नाव एकत्र घ्यावे तेव्हाच अर्थ 

एकमेकांशिवाय त्यांचे कार्य जणू निरर्थक अपूर्ण 

कोमल मऊ गतप्राण सोबतीविना काय साजरे सुवर्ण

तशी तयाची गाथा सर्वार्था सतत तत्पर प्रदीप्त 

सेवा समता ममता बंधुता अहिंसा नी प्रेम शिकवत जगाला,  श्र्वासाश्वासाला निरंतर, तरी न थकती..


अशी विरळी माणसेही असतात या जगात कोणी तेच देतात दिशा जगाला मार्गस्थ करतात योग्य पथावर 

पदभ्रष्ट होत्या जगाला निरंतर न थकता..  

जितेपणी व पंचमहाभूती विलीन झाल्या वरही.. 

निरंतर न थकता ...

न थकता....


   *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी