रिपोर्ट :
ठाणे-गोरेगाव
दिनांक : १४, १५ आणि १६ एप्रिल२०२३ रोजी
अभिमान मित्र परिवार संस्थेने अ. भी. गोरेगावकर हायस्कूल या मराठी शाळेच्या प्रांगणात आगळेवेगळे प्रदर्शन घेतले.
'आपल्या मराठी शाळा वाचवणे' असा उदात्त हेतू या प्रदर्शनामागे  होता. माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग या आयोजनात , उत्सवात हिरीरीने सहभागी झाले.
विविध खाद्य पेय पदार्थ आणि ईतर बऱ्याच वस्तूंचे प्रदर्शन विक्री स्टॉल्स तेथे होते.
सालाबादप्रमाणे *महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे शहर आणि मुंबई शाखेचे संयुक्त* स्टॉल थाटले होते. अंनिस प्रकाशन आणि चळवळीची पुस्तके तसेच चमत्कारातून विज्ञान सादरीकरणातून लोकांशी संवाद अश्या स्वरूपाचे सेवा - कार्य स्टॉलवर होते.
*स्टॉल वरील अतिमहत्त्वाच्या पुस्तक विभागाचे माहिती,  सदस्यता आणि विक्रीचे महत्त्वपूर्ण कार्य ज्येष्ठ सदस्य लांजेकर सर , सुतार सर, आणि नितांत पेडणेकर सर यांनी चोख पार पाडले.
*ज्येष्ठ अंनिस कार्यकर्ते माई वंदना शिंदे यांनी चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टीकोन हा भाग आपल्या साथी सदस्य अजित डफळे, कल्पना चेट्टियार आणि अँब्रोस चेट्टियार यांच्या साथीने सादर केले.
*तसेच  पहिल्या दिवसाच्या चमत्कार प्रात्यक्षिकाचे कार्य पार पाडताना माईंनी माहिती देत असताना सर्व लहान मोठे उत्सुकतेने ऐकत होते, त्यातच प्रदर्शन स्थळी उपलब्ध ध्वनी क्षेपक व्यवस्थेचा पूर्ण लाभ उठवत परवानगीने अँब्रोसने अंनिस ची माहिती, वार्तापत्राची आणि सदस्यतेची  माहिती उत्तम निवेदन करून दर्शक ग्राहक यांना चमत्काराची माहिती देत अपल्या स्टॉल कडे आणण्याचे कार्य सीमित अवधीत चोख बजावले.
*माईंनी खिळा पाटावर झोपून सर्व दर्शकांचे लक्ष वेधले आणि धैर्य ही वाढवले त्यानंतर अनेक मुलांनी माई ,अँब्रोस आणि अजित यांच्या मार्गदर्शन आणि साहाय्याने  खिळा पाटावर झोपून प्रात्यक्षिकाचा अनुभव घेतला ..
*याची सुरुवात कुमार असीम ने उत्तम करून दाखवली त्यानंतर चिमुकली राही आणि अनेक मुली मुले न घाबरता हे प्रात्यक्षिक करून रोमांचित झाले.. यावेळचा सर्वोच्च अनुभव होता लांजेकर सर यांचा खिळा पाटावर झोपण्याचा अनुभव - प्रयोग.  खूप सुरेख झाला.
*याच सोबत थोड्या थोड्या अवकाशाने *भूत उतरवणे आणि रिकाम्या तांब्यातून तीर्थ देणे तसेच
*लंगर सोडवणे इत्यादी चमत्कार जास्तीत जास्त प्रेक्षक आणि सभासद यांनी उत्साहाने भाग घेतला. 
*लंगर तोड प्रात्यक्षिकाचे आव्हान स्वीकारून अनेक तरुण मुलांनी अयशस्वी प्रयत्न केला तर काहींनी लंगर व्यवस्थित सोडवला ही .. अंनिस  सदस्यांनीही उत्तम सराव केला..
*सर्वच चमत्कार दाखविण्यात माईंच्या हातखंडा आहे. अंगात येणे,  कापूर खाणे हे माईंनी करून दाखवले आणि महिलांना थक्क केले. त्यामागचे विज्ञान ही माईंनी सांगितले. तांब्यामध्ये भूत पकडणे याचे प्रात्यक्षिक छोट्या राही* ने छान शिकून घेतले आहे .. आणि स्वतः करूनही दाखवले. 
*सर्वात गोड कार्यक्रम म्हणजे लांजेकर सरांनी सर्व सदस्यांना अल्पोपहाराची खमंग मेजवानी दिली .. गरमागरम वडे आणि वाफाळलेला लवंग युक्त उत्तम चहा घेवून सर्व ताजेतवाने झाले..
*शेजारच्या शिल्पकलेच्या स्टॉलवरील ज्येष्ठ शिल्पकार गुरू श्री कुबल सर यांची ओळख झाली. त्यांचे कलाकार आपल्या स्टॉल वरील चमत्कार- प्रात्यक्षिक पाहायला आले होते .
         *समारोप*
उदात्त हेतूने प्रदर्शन - विक्रीतून होणारे उत्पन्न मराठी शाळा वाचविण्या करिता शाळेला दान केले जाते. ह्या हेतूची आणि समाजोपयोगी वैज्ञानिक दृष्टीकोणयुक्त कौशल्यांची अशी आगळी वेगळी भेट सतत होत राहणे समाजाच्या आरोग्य साठी हितकारक आहे. प्रदर्शनाची सांगता मराठी शाळा वाचविण्याकरिता विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध नाटयसिने तारका चिन्मयी सुर्वे यांच्या हस्ते झाले.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे शहर आणि मुंबई* करिता अँब्रोस चेट्टियार द्वारा रिपोर्ट सादर.
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी