भाज्या तो सुच्या
*ग्रीष्म ऋतूतील दिव्य ज्ञानप्राप्ती*
माथ्यावर आलेल्या सूर्याच्या प्रभावाने आपल्या अनवधानाने वृक्षमुक्त क्रीडांगणावर स्थापित केलेल्या आपल्या द्वीचक्रीयानावर त्वरेने आरूढ होताच त्वरित मूलाधार चक्र जागृत होऊन कुंडलिनी शक्ती सर्व चक्रांचे तीव्रतेने भ्रमण पूर्ण करून थेट सहस्त्रार चक्राला क्षणात भेदते आणि सर्वत्र ज्ञानप्रकाशाचा संचार होतो.. सर्वांग रोमांचित होते, घर्मबिंदू सर्वांगावर उमटून प्रवाह धरतात आणि बुद्धी अतीद्रुत गतीने निर्णय घेवू लागते ज्ञानाची महिमा थोर..
परंतु सूर्य जसजसा पश्चिमे कडे कलू लागतो तसतसे त्या ज्ञानाची तीव्रता आणि प्राप्त झालेले बहुमोल धडे ही अनंतात विरून जातात .. असे हे दिव्यज्ञान मृत्यू लोकात ग्रीष्म ऋतूत प्रतिदिनी सुर्याचा निसर्ग कुंडलीत दशमात प्रवेश झाल्यावर नित्य प्रत्ययाला येते.. किती दिव्य ते ज्ञान ! काय तो चमत्कार ! ....
🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा