🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
*पाक्षिक बैठक वृत्तान्त:*
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक काल *रविवार दिनांक  28 May रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक  5 वाजता*  म.अंनिस ठाणे शहर अध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेत झाली.
मान्यवर सदस्य पुष्पा तापोळे, अजित डफळे, अथर्व लिपारे, हेमलता रामचंद्रंन, श्यामा अय्यर , योगिता पाडवेकर, कल्पना चेट्टियार, अँब्रोस चेट्टियार इ.  बैठकीस उपस्थित होते

बैठकीचे विषय:
👉नवीन सदस्यांकरिता सर्वांची थोडक्यात ओळख करून देण्यात आली ..
👉देशातील आजकालच्या गंभीर घडामोडीचा विषय थोडक्यात चर्चा झाली. त्यावर सामाजिक सलोखा कसा उपयुक्त ठरेल ही चर्चा झाली..
👉नुकत्याच मैत्रकूल येथे झालेल्या चमत्कारातून विज्ञान कार्यक्रमाची थोडक्यात महिती दिली गेली तसेच ठाण्यातील निर्भय बनो अभियानाची चर्चा केली गेली.
👉 माईंनी अंनिस बद्दल महत्वाची माहिती आणि इतिहास याची पुन्हा उजळणी करून घेतली.
👉आपल्या नुकत्याच सोडविलेल्या काही केसेस ची सविस्तर माहिती दिली.
👉शूरगडी तू वीरगडी तू  सर्वांकडून गाऊन घेतले आणि  नवीन गीते माईंनी शिकविली..
👉सदस्यांनी फॉर्म भरून दिले ..
कालची बैठक खूपच जिवंत, चर्चात्मक अशी झाली.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी