लोकशाही मार्ग हाच खरा मानवतेचा मार्ग आहे हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्व धुरिणांनी दाखवून दिले सिद्ध केले. मात्र तसे न वाटणाऱ्यांनी देशाचे तरीही वाटोळे करायचे प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांच्या सर्वनाशी आणि स्वार्थी कामांमुळे जनता दिग्भ्रमित झालेली आहे . हे कार्य ते मात्र अत्यंत पद्धतशीरपणे करत आलेले आहेत. त्यांनी ते नसते केले तर भारत केव्हाच जगातील प्रचंड महासत्ता आणि अखिल विश्वाला मानवतेला मार्ग दाखवणारा स्थापित झाला असता . तरीही प्राप्त विपरीत परिस्थितीतही भारताला प्रगत राष्ट्र करुया महासत्ता बनवुया हे स्वप्न उराशी बाळगून इंडिया2020 असा कार्यक्रम भारतियांना दिला. हे त्यांच्या 1998साली प्रकाशित पुस्तकातून महान वैज्ञानिक पूर्वराष्ट्रपती आदरणिय ए पी जे अब्दुल कलाम सरांनी असे आवाहन करून देशाला प्रेरणा दिली होती व त्या बरहुकुम काम वेगाने सुरू होते . जामतिक मंदीकाळातही देशाला तारून नेण्याचे धैर्य देशाला तत्कालीन पंतप्रधानानी दिले व घोडदौड सुरूच ठेवली . आणि दुष्टांनी ह्याचाच धसका घेत हीच वेळ विष कालवण्यासाठी योग्य समजून युद्धपातळीवर नीच कृत्ये करत विघातक कामांनी देशाला काळिमा फासत. देशाला खोट्या आरोपप्रत्यारोपांनी त्रस्त करून खोटारड्या लोकांनी खोट्या गोष्टिंचा गवगवा करत जनतेला भुलवून प्रचंड बलशाली लोकोपयोगी कार्य करणारे मानवतावादी, सद्लोकी-सद्विचारी-जगन्मान्य मंत्रीमंडळ सत्तेतून बाहेर केले. खोटारड्यांनी हे देशविघातक कृत्य , देशद्रोही कार्य जनतेला नाना तऱ्हेच्या खोट्या गोष्टींची पद्धतशीर पेरणी करत, साम, दाम, दंड, भेद नीती वापरत बुद्धीभ्रम करण्यात कधी नव्हे ते यश प्राप्त केले . त्यानंतर (कदाचित त्याहीपूर्वीपासूनच छुप्या पद्धतीने नसेल देशाच्या नकळत) वेगाने सर्वच यंत्रणांवर पद्धतशीर पकड करून मनासारखे करून घेतले जात आहे हे तर जळजळित सत्य आहे ......
जागृत व्हा , भुलू नका ....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा