विसाव्या शतकाच्या सुरुवाती पासून आपल्या देशात स्वातंत्र्याच्या वेगवान आणि विधायक चळवळीला  प्रचंड लोकप्रियता मिळतेय , लोकसहभाग मिळतोयसे पाहून काही लोकांमध्ये निश्चितपणे खळबळ माजली होती आणि त्याला दृश्य स्वरूपात विरोध न करता अंतर्गत छुप्या गुपचुप हालचालिंनी  नामोहरम करण्यासाठी निर्माण केली गेलेली संकुचित विचारांची  समांतर मोहीम आज जनतेच्या स्वराज्याच्या घडीला छेद देऊन गेलीच. जगाला हेवा वाटला असे कणखर तरी आपल्या जनतेसाठीचे कोमल हृदयी नेतृत्व प्रगती साठी अहोरात्र झटत असताना स्वार्थी घुशिंनी खिंडार पाडले होते. खूप गोड बोलून लोकांना फशी पाडत होते. संपूर्ण जग भांडवलशाहीला भुलून साम्यवादातील एकाधिकार शाहीला फसत असताना, मानवतेच्या, लोकशाहीच्या वाटेवर भारताला परिश्रम पूर्वक नेणाऱ्या गांधी, नेहरू यांच्या विरोधात खोटे पसरवून गुपचुप वातावरण तयार करत होते. आणि गावोगावी, खेडोपाडी हाच कार्यक्रम घेऊन लोक जीवनभर विष ओकून प्रगती पथावर जाणाऱ्या समाजाला आतून पोखरत होते. समाजात विद्वेष पेरत होते. आणि ही क्रूर खेळी आज सफल झालेली दिसते. वाहवत जाणारे भोळेभाबडे लोक नी कुटुंबे आज ह्या कुटिल कारस्थानाला बळी पडून कट्टर जात पात धर्म विरोधक बनलेत आणि जणू एकछत्री अंमल असावा असे वरून येणारा आदेश मानणारे,  अविचारी झाले आहेत. 

        ज्या गोष्टीला बुद्धांनी तेव्हा विरोध केला म्हणून बुद्ध धर्म बुडवायचा अमानवी प्रयत्न केला गेला. सम्राट अशोकाने आपल्या सामर्थ्याने पुन्हा प्रस्थापित केला . परकीय आक़्रमणेही झाली आणि पुढील सहस्रकात पुन्हा शास्त्रार्था़च्या नावाने ते सर्व खोडायचा प्रयत्न केला गेला व त्या नतर पुन्हा ह्या कार्याला वेग आलेला दिसतो. त्यानंतर समाजात वर्ण व्यवस्था घट्ट झालेली दिसते. सामान्याचा, मानवतेचा विचार करता समाजाभिमुख विचारसरणीला धूळ चारायची आणि स्वार्थांध विचाराला पुरस्कृत करायचे अशी राक्षसी खेळी करून समाज पूर्ण भयकंपित करून, अविचारी , दैववादी बनवून ठेवला गेला होता .. आणि पुन्हा मानवतेच्या वाटेवर समाजाला नेणाऱ्या बुद्ध जगणाऱ्या ज्योतिबा सावित्रीबाई पासून गांधी नेहरूं बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि ईतर महान स्वातंत्र्यसैनिकांचा भारताच्या क्षितिजावर उदय झाला आणि पुन्हा एकदा भारताने समता बंधुता मानवतेचे स्वप्न साकारण्यात सर्वस्व झोकून दिले आणि हेच मानवतेच्या परंपरागत विरोधकांना पचनी पडले नाही आणि हा गट गेल्या शतकभरात क्षणभर ही वाया न घालवता अमानवी वाटेवरचा प्रयोग करत राहिला. परिणती विरोधात उभे राहणाऱ्यांना कटकरस्थानी गटबाजी करून कांगावा करून आपल्या अविचारी विषभारित प्याद्यांमर्फत संपवण्याचा प्रयत्न करून पुन्हा आपण त्यातले नाहीच असा बनाव करण्यात त्यांचा हातखंडा. तसेच  दुष्ट बुद्धी लोकांना एकत्र जमवून,  वेळप्रसंगी असे कुकृत्य केल्यावर पाठीशी घालण्यास सदैव तयार असतात हे लोक. त्यामुळे कायद्याच्या कचाट्यातून अनेकदा सलामत सुटत आले आहेत. ह्याचे कारण भारताच्या भल्यासाठी झटणाऱ्या सच्च्या नेत्याची माणुसकी आणि सहृदयता. ह्याउलट ह्या लोकांशी जशास तसे वागून निर्णय केला गेला असता तर भारत केव्हाच आदरणीय जागतिक महासत्ता बनला असता हे खरे पण प्रगतीचा ध्या घेऊन पुढे जाणाऱ्या किती वेळा मागे वळून घडी बसवायचे काम वाढवून ठेवावे. जनतेने राष्ट्रपुरुषांचा मनसुबा ओळखून त्याना खंबीर साथ देणे अपेक्षित होते . सरदार पटेल होते तोपर्यंत ही फळी मजबूत होती, ते जाताच क्रूर बुद्धींनी कमकुवत स्वार्थी लोकांना दबाव आमिषे खोट्या भावनेची हाक देऊन भ्रष्ट केले आणि घडू नये तेच घडत गेले. एकीकडे जग भारतातील प्रगती पाहून चक्रावले. आणि दुसरीकडे ही कीड आतून पोखरत होती .     मानवतेच्या जगालाच पोखरू पाहणारी अशी समाजातील कीड समाजाने तिथल्यातिथेच निपटणे अभिप्रेत होते.  पण समाज पंगु बनवून ठेवण्यात दुष्ट यशस्वी होत होते.  आता हीच कीड जागतिक डोकेदुखी बनली आहे.. 

आपल्या पिढ्यांना यातील बरेचसे संदर्भ पाठ्यपुस्तकांतून वाचनातून उपलब्ध झाले होते. आता तर त्यातही फेरबदल करून इतिहासाशी खेळायचा प्रयत्न जोमात सुरु आहे तेव्हा सावधान !!!

लक्षात घ्या 

ते सांगतील, ते शिकवतील 

ते फितवतील, ते भरवतील

मात्र स्वत: जाणा, 

बळी पडू नका, मानू नका

भुलू नका, फसू नका,

इतिहास वाचवा, देश वाचवा, 

मानवतेचा ज्ञानदिप

जनमनात जागवा |

   *अँब्रोस चेट्टियार*

योग्य वाटल्यास पुढे शेअर करण्यास हरकत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी