निर्भय बनो आंदोलन अभियान

 वृतांत

दिनांक: २१ मे २०२३

निर्भय बनो आंदोलन अभियानाची ठाण्यात सभा 

आज सकाळी ११ वाजता ठाण्याच्या  जनरल एज्युकेशन सोसायटीच्या नामांकित मो ह विद्यालयातील सभागृहात 'निर्भय बनो आंदोलन' या देशव्यापी आंदोलन अभियानाची यशस्वी सभा झाली. 

या सभेचे ठाण्यात आयोजन करण्यात म.अंनिस ठाणे शाखा आणि ठाण्यातील समविचारी संस्थांनी सहभाग घेतला. सध्याच्या  वातावरणात भयभीत असलेल्या, अनिश्चिततेच्या टांगत्या तलवारीने हवालदिल झालेल्या सर्वसामान्य जनता, छोटे व्यापारी, कर्मचारी आणि सर्वच स्तरातील नागरिकांनी आता सरकारला जाब विचारण्याची वेळ आलेली आहे. घरात बसून राहायची वेळ निघून गेली आहे. कारण आवश्यक गरजा, शिक्षण , वैद्यकीय   सुविधांकडे दुर्लक्ष करून जनतेच्या घामाचा पैसा सरकार अनिर्बंधपणे अनाठायी वारेमाप उधळीत आहे. देशातील लोकशाही मार्गाने निर्वाचित सरकारे उधळून,  स्वार्थी असंवैधानिक मार्गाने जनतेच्या भावनेशी, जिविताशी खेळ करत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या अर्थाचा अनर्थ करत जनतेची दिशाभूल करत आहेत. या आणि अशा अनेक बाबतीत जनतेने निर्भयपणे जाब विचारायला हवे. जनतेने नुसतेच साक्षर न होता आर्थिक साक्षर व्हावे,  त्याही पुढे पाऊल टाकून आपल्या निर्वाचित सेवकांवर आपला मालकी हक्क पूर्ण गाजवावा. आजच्या कठीण प्रसंगी तर जनतेने शांत बसून न राहता सर्व पुराव्यांनिशी सरकारला जाब विचारण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे अशी काळाची गरज आहे असे विचारमंचावरून वक्ते म्हणाले. 

   सामान्य माणसाच्या प्रश्नावर चाललेली सभा, सकाळी ११ पासून १ वाजेपर्यंत समाजातील विविध स्तरातून उपस्थित नागरिकांनी शेवटपर्यंत सभागृहात ठाण मांडून कार्यक्रम उत्स्फूर्तपणे यशस्वी केला. 

       समविचारी सूत्राने एकत्र आलेले सन्माननीय वक्ते म्हणून विचारमंचावर मा. Advocate असीम सरोदे, 

मा. कुमार नागे, मा. डॉ विश्वंभर चौधरी, मा. संपादकद्वयी मा. उत्पल, आणि मा. गणेश कनाटे इ उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी आपल्या विचार मंथनातून व आयुष्यातील चौफेर अनुभवातून देशातील परिस्थीतीचा आढावा घेत नागरिकांशी उत्तम संवाद साधला. आणि शेवटी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे ही दिली.. 

वृत्तांत

अँब्रोस चेट्टियार, कार्यकर्ता म.अंनिस ठाणे शहर. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी