क्रूर धडपड

क्रूर धडपड




वारे उलटे वाहू लागले आहेत 


वारे उलटे वाहू लागले आहेत 


काल ज्यांचे सर्वस्व हिरावून आणले होते 


आज ज्यावर मालकी झाली आहे 


ते सर्व सर्व सर्वच काही,  


हे परतीचे वारे घेऊन जातील 


पुन्हा खरेच, मालक होतील. 


नाही नाही...


आताच ह्या वर्धिष्णू खजिन्यास सुरुंग लावायला हवा, 


तरच ते मातीमोल होईल,


आणि त्यांच्या उपयोगाचे राहणार नाही, 


राहू देता कामा नये. 


म्हणून निरस्त करून टाकावा हा सोयीचा मुख्य खजिना....


मुबलक जमवली आहे राशी इकडे ...


वारे उलट दिशेने वाहू लागले आहेत 


तयारीला लागावे...


त्यांना संघर्ष करू दे . 


पुन्हा खितपत पडू दे..


सत्याच्या वाटेवर नित्याचे...

  *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी