वृत्तांत,
सोमवार दिनांक २२ मे २०२३,
उल्हासनगर, ठाणे.
सोमवार दिनांक २२ मे २०२३ रोजी सकाळी १० वाजेपासून कायद्याने वागा लोकचळवळीचे प्रणेते राज असरोंडकर यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, अभिवादन करून उल्हासनगर महानगर पालिकेसमोर हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी अनेक समविचारी कार्यकर्ते आपला पाठिंबा देण्यासाठी सहृदयतेने उपस्थित होते. म.अंनिस ठाणे शहर अध्यक्षा माई वंदना शिंदे कामगार नेते राज असरोंडकर यांना आपल्या सदिच्छा देण्यासाठी उपोषणस्थळी उपस्थित होत्या.
ऑगस्ट२०२२ पासून कायद्याने वागा लोकचळवळ मनुष्यबळ पुरवठा, कंत्राटी कामगारांचे शोषण आणि भ्रष्टाचाराविरोधात लढते आहे. कामगारांच्या भल्याकरिता लढणाऱ्या चळवळीचा उद्देश अन्याया विरुद्ध खंबीरपणे कामगारांची साथ देणे व नियाय मिळवून देणे असा आहे. पगार असो भत्ते असो इतर सोयी असो सर्व हक्क लोकशाहीमार्गाने मिळवून देण्यासाठीचा हा लढा नक्की निर्णायक ठरणार आहे. शोषणाविरुद्ध, कायद्याला अनूसरून कायमस्वरूपी उपाययोजना आणि कामगारांसाठीचा विभाग व्हायला हवा या व अशा अनेक न्याय्य हक्कांसीठीची ही लढाई उल्हासनगर येथून प्रातिनिधिक स्वरूपात सुरू झाली . . हा लढा फक्त कार्यरत कंत्राटी कामगारांचाच नसून बेरोजगारीमुळे सुशिक्षित बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून भरती करून जुलमी वेठबिगारी निर्माण करणाऱ्या जुलुमाविरोधात व नवनवीन जबरदस्तीच्या जुलमी कायद्याविरोधातील ही आहे. या आंदोलनामुळे सर्व स्तरातील कंत्राटी कामगारांच्या हिताकरिता राज्यभर जागृती झाल्याशिवाय राहणार नाही. अशी आशा भेटणाऱ्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
...वृत्तान्त अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा