मानवतेचे अधुरे गीत
मानवतेचे अधुरे गीत
अलिकडेच कुणितरी
खूपच छानसं,
फारच काहीतरी,
मार्मिक असं,
मानवतेच्या काळजाला वगैरे
हात घालणारं,
समतेच्या, बंधुत्वाच्या
हाका देणारं,
भूतदयेच्या, कणवेच्या
जाणिवा जपणारं,
माणुसकीला जागणारं,
जागवणारं,
हाताला हात देणारं,
साथ देणारं,
पोटाला घास देणारं,
खळाळून हास्य देणारं,
पूर्वापार भावना जपणारं,
समाजाला सांधणारं,
घट्ट वीण घालणारं,
स्वत:ला विसरणारं,
सर्वस्व झोकून देणारं,
वाट दाखवणारं,
असं खूप काही सांगणारं,
अर्थपूर्ण काव्य गाणारं,
माणूस जागवणारं,
संघर्षाला सामोरं जाणारं,
सर्व सर्व काही सांगणारं,
लिहिलं प्रेरणा देणारं,
आशेने वाचत पुढे जाणारं,
मन पुढे पुढे धावणारं,
ज्वालामुखीचा उद्रेक
सागणारं
शांतीचा सह्याद्री प्रसवणारं,
कवितेला शेवट पर्यंत
पुन:पुन्हा वाचून भंडावणारं,
अर्धवट शेवट पाहून थंडावणारं,
एकाच शब्दाची आस शोधत जाणारं,
तरीही तो शब्द न लिहिणारं
अपु़ूर्ण मानवतेचं कवित्व
गांधी अभावी ओसरणारं
गांधी अभावी ओसरणारं
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा