वृत्तांत्त


दिनांक २६ मे २०२३ रोजी, मैत्रकुल या अनन्यसाधारण कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या शिबिरात अंनिसचा चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोन कार्यक्रम झाला.  संस्थापक किशोर गणाई यांनी अंनिस अध्यक्ष ठाणे शहर , माई वंदना शिंदे यांचे व अंनिस कार्यकर्ते अँब्रोस आणि कल्पना चेट्टियार यांचे स्वागत करून औपचारिक ओळख करून दिली. यावेळी हे शिबिर ठाणे जिल्ह्यातील पारगाव, सफाळे,  येथील नाईक फाउंडेशनच्या पिरॅमिड हाऊस मध्ये पार पडत आहे. 

IN2 FUN2  इंटू फनटू , असे या शिबिराचे मस्त शीर्षक होते. संस्थेतील सर्व मुलांसाठी हे शिबिर धम्माल मज्जा मस्ती इ. ची एक दुर्मिळ संधी होती.  मैत्रकूलचे संस्थापक  किशोर गणाई,  शिक्षण घेणाऱ्या सर्व लहान  मोठ्या  अगदी पहिली ते महाविद्यालयीन मुलांना शिक्षण सुविधेकरिता सर्वस्व पणाला लावून झटताना आपण पाहतो. स्वतः पायाने जायबंदी असूनही व्हील चेअर वरून पायपीट करत किशोरदाने भल्याभल्यांना  दमछाक व्हावी असा आणि इतका मार्ग तुडवला आहे . .   एकूण चार दिवसांचा भरगच्च कार्यक्रम असलेले हे शिबिर विविध कलागुण, छंदवर्गयुक्त संस्कार शिबिराच्या आयोजनाची अप्रतिम भेट किशोरदांनी मुलांना दिली ..  अशा प्रकारच्या शिबिराचे हे ७ वे वर्ष आहे. दि २५ ते २८ असे चार दिवसीय शिबिरात प्रथम दिवशी अभिनय कला हा वर्ग मुलांकरिता घेण्यात आला. शिबिरार्थी मुलांच्या गटांनी सर्व कार्यक्रमाचे छान नियोजन केले होते. त्यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा धावता आलेख वाचला..  आजच्या कार्यक्रमाची व आमची ओळख करून दिली. 

         अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे शहर अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी कार्यक्रमाची सुरुवात पाण्याचा दिवा हा चमत्कार दाखवून केली. अंनिसचा चमत्कारातून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कार्यक्रम एकूण उपस्थित सवाशे हून जास्त मुलांनी डोळे विस्फारून,  जल्लोष करत पाहिला. आणि एकेक चमत्कार करण्यास हिरीरीने पुढे येत भाग घेतला. किशोर गणाई दादांनी मुलांना खूप प्रोत्साहन दिले आणि नेहमी प्रमाणे अंनिस अध्यक्ष ठाणे शहर माईं, वंदना शिंदे यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवत नेत शेवट पर्यंत मुलांना खिळवून ठेवले. चमत्कारी पाण्याचा दिवा लावणे, नारळातून करणी काढणे, अंगात येणे व जळता कापूर खाणे, भूत लोट्यात पकडणे, इष्ट नद्यांचे तीर्थ रिकाम्या कलशातून काढणे असे आश्चर्याने थक्क करणारे चमत्कार मुलांना करून दाखवले.. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी ही  वरील चमत्कार करून पाहण्याचा उत्साह दाखवला. अंनिस कार्यकर्ता अँब्रोस यांनी खिळापाटावर झोपणे हा चमत्कार सादर केला. त्यानंतर अनेक मुलांनी हा चमत्कार स्वतः आजमावून पाहिला. विद्यार्थी गटांनी सर्व कार्यक्रमाचे छान नियोजन केले होते.  

     त्यानंतर आजचे विशेष अतिथी प्रथितयश लेखक, अनुवादकार एस एस यादव पती पत्नी, आणि पुण्याच्या नामाकित बी जे मेडिकल कॉलेजचे प्रा. डॉ फुलमाळी आणि मिसेस फुलमाळी यांच्या करवी  दुपारच्या सत्राचे भोजन व्यवस्थापन सोय केली गेली होती. मुलांनी सर्व पाहुण्याचे व आश्रय दाते यांचे आभार मानले आणि हा गोड कार्यक्रम संपन्न झाला..

  *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी