1925 साला पासून सुरुवात केलेली समांतर मोहीम आज जनतेच्या स्वराज्याच्या घडीला छेद देऊन गेलीच. जगाला हेवा वाटला असे कणखर तरी आपल्या जनतेसाठीचे कोमल हृदयी नेतृत्व प्रगती साठी अहोरात्र झटत असताना स्वार्थी घुशिंनी खिंडार पाडले होते. खूप गोड बोलून लोकांना फशी पाडत होते. संपूर्ण जग भांडवलशाहीला भुलून साम्यवादातील एकाधिकार शाहीला फसतलअसताना, मानवतेच्या, लोकशाहीच्या वाटेवर भारताला परिश्रम पूर्वक नेणाऱ्या गांधी, नेहरू यांच्या विरोधात खोटे पसरवून गुपचुप वातावरण तयार करत होते. आणि गावोगावी, खेडोपाडी हाच कार्यक्रम घेऊन लोक जीवनभर विष ओकून प्रगती पथावर जाणाऱ्या समाजाला आतून पोखरत होते. समाजात विद्वेष पेरत होते. आणि ही क्रूर खेळी आज सफल झालेली दिसते. वाहवत जाणारे भोळेभाबडे लोक नी कुटुंबे आज ह्या कुटिल कारस्थानाला बळी पडून कट्टर जात पात धर्म विरोधक , आणि जणू एकछत्री अंमल असावा असे वरून येणारा आदेश मानणारे अविचारी झाले आहेत.
ज्या गोष्टीला बुद्धांनी तेव्हा विरोध केला म्हणून बुद्ध धर्म बुडवायचा अमानवी प्रयत्न केली गेला. सम्राट अशोकाने आपल्या सामर्थयाने पुन्हा प्रस्थापित केला . परकीय आक़्रमणेही झाली आणि पुढील सहस्रकात शंकराचार्यानी पुन्हा शास्त्रार्था़च्या नावाने पुन्हा ते सर्व खोडायचा प्रयत्न केला व त्या नतर ह्या कार्याला वेग आलेला दिसतो. त्यानंतर समाजात वर्ण व्यवस्था घट्ट झालेली दिसते. सामान्याचा, मानवतेचा विचार करता समाजाभिमुख विचारसरणीला धूळ चारायची आणि स्वार्थांध विचाराला पुरस्कृत करायचे अशी राक्षसी खेळी करून समाज पूर्ण भयकंपित करून, अविचारी , दैववादी बनवून ठेवला होता .. आणि पुन्हा मानवतेच्या वाटेवर समाजाला नेणाऱ्या बुद्ध जगणाऱ्या गांधी नेहरूं आणि सर्वच महान स्वातंत्र्यसैनिकांचा भारताच्या क्षितिजावर उदय झाला आणि पुन्हा एकदा भारताने समता बंधुता मानवतेचे स्वप्न साकारण्यात सर्वस्व झोकून दिले आणि हेच मानवतेच्या परंपरागत विरोधकांना पचनी पडले नाही आणि गेल्या शतकभरात त्यांनी क्षणभर ही वाया न घालवता हा अमानवी वाटेवरचा प्रयोग कररत राहिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा