बुद्धांचा मार्ग जर जगाने सहर्ष स्वीकारला तर शांती आण़ि विज्ञान दोन्ही एकत्र नांदतील.  परंतु उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावरील विविध शाखांचे वंशज आपापल्या परीने वर्चस्वाचा प्रयत्न करतील ह्यात शंकाच नाही . परंतू अत्यंत उन्नत अशा शाखेचे वंशज मात्र शांतीचा मार्ग प्रस्थापित करण्यात अग्रेसर राहतील . ह्या करिता विविध मानव शाखा कुल संकर होऊन अत्युत्तम , सर्वोच्च उन्नत अशा मानवाचा प्रवास होत राहणे केव्हाही अत्याआवश्यक . परंतु यालाच मज्जाव करायचा असा संकुचितांचा रोख असतो . 

  याला आणखी एक उपाय आहे . बुद्धीचा विकास होईल असे मार्गदर्शन मिळणे . ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याने ईतरांना ते ज्ञान द्यावे . आणि ते प्राप्त करणाराने स्वत: स्वत:ला उन्नत करून घ्यावे. किती ऩैसर्गिक सोपा नी सहज, सुगम भासणारा मार्ग हा. परंतु ह्या मार्गाला स्वार्थ्यांचा विरोध असणेही क्रमप्राप्तच नाही का ? सर्व सत्ता त्यांच्याच कडे असावी त्याकरिता संकुचित कुटुंब-कबीला अस क्षूद्र विचार . आणि व्यापक विश्वकुटुंब , भूतदया,  मानवता हा मूळ भारतीय,  मानवीय, वैश्विक विचार  क्षूद्र स्वार्थाने नजरे आड करून,  विध्वंसक क्रौर्य कवटाळून,  मानवतेला काळिमा फासण्याचे कार्य मात्र अव्याहत सुरू आहे .  इतकेच की कधी ते मलूल होतात कधी प्रबळ कधी अतीप्रबळ..   परंतू त्यांचा तो विचार मूळ धरून नेटाने पुढे रेटण्याचे कार्य मात्र ते मूर्ख, स्वार्थी, अमानवी वर्चस्ववादाच्या विचाराने प्रेरित, भारित,  आपल्या आरेखित मार्गाने कालक्रमण करित जातच आहे.. 

यावर सर्वकल्याणकारक विचार व्हावा. सुधार व्हावा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी