बुद्धांच्या मार्गाचा स्वीकार,  प्रचार, प्रसार अनेक महात्म्यांनी केला, त्यांच्या मार्गावर चालण्याचाही प्रयत्न अनेक महात्म्यांनी आजवर केला आणि आयुष्ये बदलून टाकली. थेट बुद्धांपासून सम्राट अशोक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत अनेक महान व्यक्तिंनी हा मार्ग चोखाळला.  त्यापैकी एक,  बाबासाहेबांना समकालीन असे,  अगदी सर्वांना परिचित नाव ,   आपल्या मानवतेच्या कार्याने, कठोर तपाचरणाने संपूर्ण जगाला प्रेरित करणारे व्यक्तित्व म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधीच्या आयुष्याचा अभ्यास केल्यास हे सहज स्पष्ट होते. 

नेमके हेच सामान्य लोकांना समजायला नको म्हणून अनेकांनी नानाप्रकारे समाजमनात नानाविध विषे कालवून ठेवली आहेत. तेव्हा हे सहज पचनी पडणारे नक्कीच नाही. गांधीं मानवी जीवन अभ्यासून, अनेक शास्त्रे अभ्यासून, चरित्रे अभ्यासून , अनेक ठिकाणी प्रश्न विचारून पुढे जात गेले आहेत. ह्याचे मूळ बुद्ध तत्वज्ञानाच्या प्राथमिक धड्यात आहेत. बुद्ध म्हणतात मी सांगतो म्हणून मानू नका. स्वत: अभ्यासा, शोध घ्या , खात्री करा. किती काळापुढचे,  नित नवे तत्वज्ञान आहे बुद्धांचे !  आणि नेमके तेच नको आहे काही लोकांना. तद्वतच गांधी आणि त्यांचे विचारही नको आहेत.  तेव्हाही त्यानी जंग जंग पछाडले, आताही तेच करत आहेत. 

सावध असा.. जागृत व्हा ..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी