पाक्षिक बैठक वृत्तान्त:
दिनांक : ७ मे २०२३
नमस्कार,
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक आज रविवार दिनांक ७ मे २०२३ रोजी सायंकाळी ५ ते ७:३० या वेळेत माई वंदना शिंदे,  अंनिस अध्यक्ष ठाणे शहर यांच्या अध्यक्षतेत पार पडली.
यावेळी  अजित डफळे, पुष्पाताई तापोळे, कल्पना चेट्टियार, अँब्रोस चेट्टियार हे अंनिस सदस्य उपस्थित होते.

बैठकीचे विषय:
☑️ चळवळ गीत- पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा हे गीत घेतले.
☑️ नवीन कार्यकर्त्यांना जोडून घेणे या करिता सभासद नोंदणी अभियाना चे नियोजन केले गेले.
☑️  माईंच्या ज्येष्ठ अंनिस सदस्य चौघुले सर आणि नानावटी सर यांच्या बेळगाव भेटीची माहिती मिळाली..
☑️ अनेक विषय अनिंग्रूपवरील पोस्ट यावरही साधक बाधक चर्चा झाली ...
☑️तसेच एक पीडित महिलेची व्यथा कल्पना यांनी मांडली. त्यांना मदतीचा हात देताना कोणत्या टप्प्यांचा विचार व्हायला हवा हे ही माईंनी सविस्तर सांगितले ..
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी