वृतांन्त
दिनांक 2 जून 2023,
ठाणे रेल्वे स्थानक.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे शहर
मागील पाक्षिक बैठकीत ठरल्या प्रमाणे आज दिनांक 2 जून 2023 रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत ठाणे रेल्वे स्थानक येथील मुख्य तिकिटगृहाशेजारील वाहतुक पोलीस नियंत्रण कक्षालगत सभासद नोंदणी अभियान राबविले गेले.
अध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेत आणि मार्गदर्शनात या कार्यासाठी उत्साहाने अंनिस सदस्य अजित डफळे, पुष्पा तापोळे, अथर्व लिपारे, सुनिल दिवेकर, अशोक चव्हाण आणि अँब्रोस चेट्टियार उपस्थित होते. आपला बॅनर पाहून गर्दीतून वाट काढत येणाऱ्या उत्सुक जनांना माहिती देण्याचे काम सदस्यांनी केले .
माईंनी प्रथम पासून ध्वनिक्षेपकाची कामे सांभाळली. आणि अधून मधून लोकांना फॉर्म बद्दल माहिती देत . कार्याबद्दल माहिती देत व नोंदणीचे आवाहन करत , असे चौफेर कार्य माई करत होत्या. त्यानंतर ध्वनी विभाग अँब्रोस आणि दिवेकर यांनी सांभाळला ..
पोलीस प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभल्याने कार्यक्रमास उभारी मिळाली. धावपळीच्या वेळी आणि घाईगर्दीच्या ठिकाणी असूनही यंदाचा सदस्य नोंदणीचा ह्या प्रथम प्रयोगास नागरिकांचा , प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वाच्या सहभागाने कार्यक्रम यशस्वी झाला..
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा