अहवाल 25 june 2023
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
नमस्कार, जय हिंद, स्वागतम्
*आपल्या ठाणे शहर शाखेची नियोजित पाक्षिक बैठक संपन्न*
काल रविवार दिनांक 25June रोजी, नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक 5 वाजता विद्यमान शाखाध्यक्ष माई वंदना शिंदे यांच्या अध्यक्षतेत आपली ठाणे शहर शाखेची पाक्षिक बैठक अध्यक्षांचे निवास स्थानी गणराज हाईट्स,
फ्लॅट क्र. ७०१ बी विंग ७वा मजला, आदर्श नगर कोलबाड, ठाणे-400601 येथे पार पडली.
*बैठकीत उपस्थित विषय आणि त्यावरील निर्णय खालील प्रमाणे*
बैठकीचे विषय:
प्रा. एन.डी.पाटील वैज्ञानिक जाणिवा प्रबोधन अभियान कार्यक्रम अंतर्गत पुढील कार्यक्रमांचे नियोजन सुरू.
कार्यकर्त्यांनी सहभाग देण्याचे आवाहन..
*पुस्तक वाचन अंतर्गत ज्येष्ठ सामाजिक विचारवंत लेखक सुरेश सावंत यांचे पुस्तक संविधानाचा अन्वयार्थ या पुस्तकावर चर्चा झाली ..
*चळवळ गीत- १) दाभोलकर अभिवादन गीत चाल ज्योतिबा फुले गीत , २) दान मूर्तीच देवून - पाणी प्रदूषण टाळा , ३) रुसलाय का मजवरी बाबा शिव लवकरी ..४) या पंचांग वाल्यांन लई अज्ञान वाढविल ..
*पुढे येऊ घातलेले आणखी काही कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांचा सहभाग - जिल्हा कमिटी मीटिंग उपस्थिती बद्दल माहिती आणि चर्चा झाली ..
*नवीन कार्यकर्त्यांना जोडून घेणे - पुष्पा ताईंनी वार्तापत्र करिता नवीन नोंदणी आणली त्यांना जोडून घेतले ..
*आयत्यावेळी येणारे विषय - अध्यक्षांनी गौप्यस्फोट केला आपल्या शाखेतून अँब्रोस चेट्टियार यांना यंदाचा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे.. त्याबद्दल सर्वांनी कौतुक केले आणि नेहमी प्रमाणे माईंनी सर्वांचे लाडू देवून तोंड गोड केले ..
तसेच
मध्यवर्ती कार्यकारिणीस शाखा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांचे पदभार व नाव पाठविणे करिताचे अनेक बैठकीतून राज्य व जिल्हा स्तरावर आवाहन होत असून त्याची माहिती उपस्थित सदस्यांना अध्यक्ष सतत देत होत्या. आजच्या बैठकीत कृतिशील कार्यकर्त्त्यांची कार्यकारिणीवर निवड सर्वानुमते झाली असून त्यांची नावे आणि पदभार पुढील प्रमाणे
नव निर्वाचित
१) अध्यक्ष - माई वंदना शिंदे
२) सचिव - अजित डफळे
३) कार्याध्यक्ष - अँब्रोस चेट्टियार
४) कोषाध्यक्ष - पुष्पाताई तापोळे
५) महिला विभाग आणि इतर - कल्पना चेट्टियार आणि पुष्पाताई तापोळे
६) युवा विभाग - अथर्व लिपारे
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन.
सदर बैठक रविवार दिनांक *25June* रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी ठीक 5 ते 7.15 pm अशी नियोजित वेळेत अध्यक्षांचे निवास स्थान गणराज हाईट्स,
फ्लॅट क्र. ७०१ बी विंग ७वा मजला, आदर्श नगर कोलबाड, ठाणे-400601 येथे पार पडली.
बैठक अहवाल अँब्रोस चेट्टियार.
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा