अंनिस ठाणे 

7जून 2023

    भारतीय महिला फेडरेशनच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात "महिलांचे विविध प्रश्न सोडवताना अनेकदा वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रभावी आणि समयोचित उपयोग करून घ्यायला हवा ". असे ठाणे शहर अंनिस अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी सुचवले . महिलांचा एखादा प्रश्न चिघळत न ठेवता त्वरित आणि मुळापासून निकाली काढण्याकरिता जेवढ्या लवकर तो प्रश्न सोडवायला सुरुवात केली जाईल तेवढे श्रेयस्कर . त्यामुळे संबंधितांचे मानसिक भावनिक आर्थिक इ... कमीत कमी नुकसान होईल आणि अधिक समाधानकारक परिणामकारक उपाय करता येऊ शकेल.  

..... सुचनेप्रमाणे महिलांनाच वैज्ञानिक दृष्टिकोनाचे धडे दिले तर त्यांचे अनेक प्रश्न त्यांच्याच स्तरावर सुटतील आणि वेळ पैसा श्रम इ. वाचू शकेल ... ठाणे शहर अंनिस अध्यक्ष माई वंदना शिंदे यांनी चर्चे दरम्यान केलेल्या ह्या सुचनेस महिला फेडरेशनच्या अध्यक्ष ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई महाजन यांनी सहमती दर्शविली आणि सूचनेचे कौतुक केले | अश्या प्रकारे समविचारी संस्थांनी महिलांच्या बाबतीत असे काही करण्यासारखे खूप आहे त्याबाबतीतलाच हा एक सकारात्मक विचार आहे असे ही सांगितले...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी