आली पटकी याला

आली पटकी याला 


द्यावा कोल्हापुरी मानाचा 

द्यावा फटका याला 

आनलं आशेनं सुदरन का 

आली पटकी याला 


याच्या अंगात लई माज 

आली पटकी याला 

माज उतरन का त्यानं

आली पटकी याला 


याच्या जिभंला नाय हाडं

आली पटकी याला 

याच्या डोस्क्यात कारस्थानं

आली पटकी याला 


याच्या पायाची वाट वाकडी

आली पटकी याला 

याच्या डोळ्यात घाण साटली 

आली पटकी याला 


याच्या भासनानं लाज आनली 

आली पटकी याला 

याच्या वचनानं नाक कापलं 

आली पटकी याला 


याचे विचार बारबोडे 

आली पटकी याला 

याच्या मेंदूत गू भरला 

आली पटकी याला 


याचा गुरूचा देखावा

आली पटकी याला 

याच्या पायदळी माणुसकी

आली पटकी याला 


मायभगिनिस ना मोजी 

आली पटकी याला 

याला संपत्ती लागे भली

आली पटकी याला 


यास मालकाची हो मर्जी

आली पटकी याला 

मग रयत मरो भली 

आली पटकी याला 


आली पटकी याला 

आली पटकी याला 

आली पटकी याला 

आली पटकी याला ....होssss !!!!

     *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी