निखारा

 


निखारा


एखादा निखारा, त्यालाही बोचावा,

आग लावणारा, सावध जो |


सावज करोनी, प्रेमे टिपियले, 

बंदिवान केले, भक्ता ज्याने |


उगाच आळवी, रागदेस उठसुट,

भाव नाही सूरी, बेतालचि ताल |


शेवट एकच, भाषणाचे मर्म,

सुख लोकाचे त्या, पाहवेना |


ठिणगी टाकोनी, फुलवी निखारा,

पदर जाळोनी, देतो की प्रकाश |


सांगती ते सुख, दाविती ते सुख

आपल्या सुखास,  पारखेचि  |


मूळचि छाटोनी, कैसे फुले रोप

भरदार वृक्ष, कल्पा म्हणे |


एखादा निखारा, त्यालाही बोचावा,

आग लावणारा, सावध जो |

  *अँब्रोस चेट्टियार*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी