आम्ही हौशी नाटकवेडे मित्र प्रॅक्टिस म्हणून मिळेल त्या संस्था सोबत पथनाट्य इ. करत असू.. चांगले मराठी हिंदी येत असल्याने छान जमून येई..एके दिवशी चर्चेदरम्यान एका ठिकाणी संस्थेतील दोन senior आपसात मोठ्याने चर्चा करत असताना काही शब्द कानावर पडले .. पटकन माझ्या तोंडून निघाले हे तर communist विचार वाले आहेत .. मित्र ही बाचकला .. तिथून निघताना त्यांचे ते एकांगी अतिरेकी समानतेचे विचार चीन रशिया चे उदाहरण असे विस्तृत चर्चा स्वातंत्र्य लढा वगैरे होऊन वेगवेगळे विचार नी त्यांचे पक्ष इथवर आले. ही चर्चा होईतो आम्ही घरी ट्रेनने  परतत होतो .. शेजारी बसलेल्या आजोबांनी मध्येच आम्हाला तोडत सांगितले .. बेटा उनको जीना जिलाना नही  आता..  सिर्फ मरने की बाते करना आता है..  इसीलिये तो गांधी नेहरू ने रूस मार्क्स की राह न पकडी भारत के लिये लोकतंत्र युक्त समाजवाद की बेहतर राह चुनी.... तेव्हा नीट समजल नाही.. नंतर ह्या वाटा कश्या वेगळ्या आहेत नी त्या द्रष्ट्या लोकांना तेव्हाच भारताची प्रगती कोणत्या मार्गाने होईल हे कसे आकळले याचे आश्चर्य वाटत राहिले...अर्थात नाटकात ही काही अजिबात दिवे लावू शकलो नाही हा ही इतिहास मात्र नमूद करायला हवा .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी