रिपोर्ट :
स्थळ : कल्याण, महात्मा ज्योतिबा फुले चौक.
7जून 2023
कल्याण पश्चिम येथील स्थाइक महेंद्र गौरीकुमार बैसाणे या समविचारी सामाजिक कार्यकर्ते यांच्या विनंतीवरून अंनिस ठाणे शहर अध्यक्ष माई वंदना शिंदे काल कल्याण येथील महात्मा ज्योतिबा फुले चौक पोलील ठाण्यात परस्पर गेल्या . तेव्हा बैसाणे यांनी सांगितलेली माहिती पुढीलप्रमाणे.
लोकगीत भक्तीगीत गात घरोघरी फिरणाऱ्या वासूदेव म्हणून फिरणाऱ्या व्यक्तीस कळकळीने चाय पे चर्चा वगैरे करत चहापान करवून कोण कुठले पोटापाण्याचे साधन काय आणि अशा फिरण्याचे प्रयोजन इत्यादी विचारत असता . आपण देवाचे वासुदेव असून आळंदी येथील आहोत असे सांगितले ..तसेच लोकांच्या आयुष्यातील प्रश्न आम्ही सोडवितो असे उर्मट उत्तर मिळाले . प्रात्यक्षिक म्हणून एक दोरा मागवला गेला. " तुमचेही काही प्रश्न सुटतात का पाहुया" असे ती व्यक्ती म्हणाली.. दोरा आणल्यावर काही प्रश्न विचारत त्या दोऱ्याचे तुकडे केले व थोड्या वेळाने काही पुुटपुटत तो दोरा पुन्हा अख्खा काढून दाखवला.. या प्रकारामुळे बेचैन व सावध होऊन बैसाणे यांनी वासूदेववाल्याला असल्या थोतांडाबद्दल जाब विचारला . असे असल्यास तक्रार होऊ शकते हे ही सांगितले. तरी फरक पडत नाही असे पाहून. तडक महात्मा ज्योतिबा फुले चौक. पोलिस ठाणे गाठले व तक्रार सांगितली व लेखी तक्रार दिली. तिथे त्यांची ओळख बऱ्यापैकी दिसत होती परंतु तक्रारीची विशेष दखल न घेता एक हवालदार सोबत पाठवला गेला आणि जवळच फिरणाऱ्या त्या बाबाला शोधून काढण्यात आले आणि तिथल्या तिथे त्याला असले काही तू इथे करू नकोस इतके सांगून त्याला सोडून देण्यात आले.. तक्रार नोंदवून घेतली नाही ..
हा प्रकार पूर्ण समजून घेतल्यावर माईंनी चौकीतील ज्येष्ठ पोलिस अधिकारी यांना प्रथम आपली ओळख करून देवून प्रकरण सविस्तर सांगितले .. सदर प्रकरणात एक जागरूक नागरिक जागरूक असल्याने स्वतःचा बचाव झाला परंतु अज्ञाना मुळे बायका लहान मुळे व वृद्ध यांना अशी चमत्कृती दाखवून सहज लुबाडता येवू शकते.. या बाबतीत ह्या बुवाला तिळमात्र ही खंत नाही .. समाजात मोकळा सोडलेल्या अश्या व्यक्तीमुळे एखादा गुन्हा घडून त्यानंतर त्यावर उपाय नी हळहळ व्यक्त करून काय उपयोग .. आपण तक्रार घेवून सादर इसमाला चौकीत आणून विचारपूस करायला हवी होती.. जेणे करून त्याच्या कामावर थोडा अंकुश बसवता आला असता.. या वर सहमत अधिकाऱ्यांनी आपल्या शेजारील वस्तीत वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधनाचे कार्यक्रम करण्याचे सुचवले .. आणि बैसानेंची तक्रार ही नोंदवून घेतली आणि त्या इसमाला शोधून योग्य तो उपाय करण्याचे व तसे कळविण्याचे आश्वासन दिले . अश्या प्रकारे समाजात नागरिक आणि पोलीस अधिकारी यांच्यात तिढा बसून नकारात्मक परिणाम साधत आलेल्या एका प्रश्नाची योग्य हाताळणी केल्याने तिथल्या तिथे सकारात्मक परिणाम दिसून आला याचे उदाहरण माईंनी दाखवून दिले .. ही माहिती सविस्तर सांगताना, आपल्या डॉक्टरांचे शांत संयमित प्रश्नाला धरून चर्चा सकारात्मक दिशेने नेण्याचे अफाट कसब याची आठवण आल्याचे सांगितले. त्यांच्या कडून खूप शिकायला मिळाले आणि अजूनही शिकत आहे. असे सांगून सर्व श्रेय डॉक्टरांचे असे माईंनी संगितले..
अँब्रोस चेट्टियार
म.अंनिस ठाणे शहर.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा