बाप्पा
बाप्पा
बाप्पा मोदकाची
आस सांगून
भक्ताच्या भेटिला येता
आला सण जवळी
बाप्पा भेटीला
लागा तयारीला आता ...2
पहा तयारी करावी चोख
नको उराया कुठेच मेख
पानाफुलास नकोच ठेस
मनोभावे हो दर्शन खास
राखा निसर्ग
फुलवा आसमंत
आनंदाचे गीत गाता
आला सण जवळी
बाप्पा भेटीला
लागा तयारीला आता
काय करू नी नकोसे झाले
मन स्वागतास सज्ज झाले
रोमरोमात बाप्पाच भरले
घर आनंदाने सारे भरले
पंचपक्वाने
मनोभावाने
घराघरात सुखाचा राबता
आला सण जवळी
बाप्पा भेटीला
लागा तयारीला आता
थोरामोठ्याला बाप्पाचे वेड
दहा दिवसांचे स्वप्न हे गोड
गीत भजन टाळचिपळ्यानी
घरभरून आरती गाथा
नित्य नेमाने
भेट शेजारी
प्रेमाला भरती आता
आला सण जवळी
बाप्पा भेटीला
लागा तयारीला आता
पाणीपाऊस मोठाले थेंब
मन हिरव्या शेतात चिंब
गाव शहर चंदन गंध
आगमनाचा विचार धुंद
ऊन पावसाची
झाली पखरण
फुलली धरणी माता
आला सण जवळी
बाप्पा भेटीला
लागा तयारीला आता
©अँब्रोस चेट्टियार
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा