दैन्य

 

दैन्य

कवी राज रोस आता पिडू लागला जनास
फेका चिडून तांबाटे त्याच्या मनी मोठी आस

जनी रोष खदखदे काय द्यावे या उत्तर
दाणागोटा ही संपला कवी छळण्या सादर

दोघांचेही दु:ख मोठे याची दोघानाही जाण
नको रडवू रे बाबा काय द्यावे तुज दान

नाही मनाचे रंजन काव्य हसवून मारी
हासे पोटाची खळगी भूक रडवून भारी

नाही कोणाचे कोणाला येथे सुखदु:ख काही
ज्याचे त्याला पुरे झाले सारे ओंडके प्रवाही
  © अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी