दक्षिणा

 गुरू स्वताच एकाशिष्याला जेव्हा दक्षिणा मागतो तेव्हा त्याच्या कडे दुसऱ्याला देण्याशिकवण्यासारखे काहीच उरलेले नसते किंवा तेवढे नाविन्यपूर्ण वा नवनिर्मितीक्षम सामर्थ्य उरलेले नसते. आणि त्याने मिळवलेले ही सहज आपलेच म्हणून लाटायची ही आणखी एक सुलभ योजना तसेच आपले एकूणच ज्ञान डावे ठरू नये म्हणून केलेली ती चाणाक्ष योजना असावी..  कफल्लक भासणारा तो शिष्य मुळात आपल्याच अधिकारांची जाणीव नसलेला असा एव्हाना बनवण्यात यश आलेले असते व आपल्या कमकुवत पण क्षणिक लाभदायक दुसऱ्या शिष्यास स्थापित करायचे असते. त्याकरिता आपल्याला मिळालेले आकर्षक लाभ सोडायचे नसतात. म्हणून दक्षिणा मागून मुळात अनभिज्ञ शिष्यास आणखी कमकुवत करण्याची पद्धतशीर योजना असते.. त्याकरिता मानसिक, भावनिक गुंता निर्माण करण्याचे कार्य मात्र पूर्वापार अव्याहत चालत  आलेले असते.. हं... मात्र ते ही , तोच मुळात येथील मूळ वारसदार असतो  हे चांगलेच जाणून असून  त्यालाच कळू न देता सुरू असते,  अव्याहत !!! 

पण एवढा विचार करतो कोण ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी