अंधमंद रसिक

अंधमंद रसिक


हल्लीच एका अंधमंद रसिकाने आपल्या धुंदीत रस्त्याने जाताना कडेच्या शेतातील कामात मग्न बाईला जबरदस्तीने धरून ओठावर चुंबन दिले.  ती स्त्री क्षणभर हडबडून  गेली.  सावध होताच तिने त्याला उत्तरादाखल हलकेच जवळ ओढले. त्याच्या अनाहुत चुंबनाचा परतावा म्हणून त्याला चुंबन देऊ केले. तो विळख्यात येताच त्याचा खालचा ओठ कडकडून चावून वेगळाच केला. तो कळवळला तडफडला पण तिने निकराने आठवण म्हणून त्याच्या हातात त्याचाच ओठ ठेवला. हतबुद्ध झालेला तो अंधमंद रसिक अचानक राक्षस पाहिल्यागत फाटक्या तोंडाने किंचाळत वाट फुटेल तिकडे पळत सुटला. त्याचा पुरता इलाज करून ती आपल्या हातातील विळ्याने तण स्वच्छ करण्याच्या कार्यात रममाण झाली. 

    *अँब्रोस चेट्टियार*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी