महामार्ग

🙏🏾

या विषयावर खूप लोक खूप काही बोलत आहेत .. अनेक दिव्य ज्ञान सांगत आहेत ... फक्त विचार करा कोण बांधते आहे का बांधते आहे त्यातून जनतेला काय विशेष मिळणार आहे आणि सांगोपांग विचार करून झाल्यावर . एक प्रश्न स्वतःला विचारा की येन केन प्रकारेण जनतेला सतत मूर्ख दोषी ठरवणे कितपत योग्य ??  आपल्या वर जो पर्यंत ओढवत नाही तो पर्यंत ठीक ? मग आपणही त्याच मूर्ख दोषी पदवी प्राप्त झाल्यावर डोळे उघडणार का ? 

त्वरित बाजू बदला आणि सामान्य  नागरिकाच्या बाजूने विचार करायला शिका..


   ...हे महामार्ग म्हणजे महाद्वार, ते नेमके कोणाला कुठे नेतायत याचा विचार व्हावा ... हे का सापळे बनत चाललेत ???

...याची आपल्याला खरंच गरज आहे का ?

विदेशात कुठे कुठे म्हणे रस्त्या कडेला नुसते पाऊल टाकले की रहदारी थांबते व पादचाऱ्यास प्रथम जाऊ दिले जाते .. मग तो कोणताही रस्ता का असेना . पायी चालणाऱ्या जिवाचा हक्क पहिला आणि मगच वाहने..तेच सयुक्तिक ही आहे ...माणसासाठी हे रस्ते आहेत..  तशी व्यवस्था तशी तांत्रिक प्रशिक्षण योजना कठोरपणे आपल्या कडे रस्ते प्राधिकरण करून घेणार का ? विषय सोडा ... 

....टेंडर भरले की प्रथम पैसा हवा ..मग त्याची योग्य '  विल्हेवाट लागली की म्हणे तोट्यात गेलो .. 

दसपट किंमत घेवून ही हे वर्षभरात तोट्यात कसे जातात चोर ? 

आणि जेथे पुल नादुरुस्त मोडकळीस व पडझड अवस्थेत येतो तेव्हा कोणी दुरुस्ती करावी ? किती वर्षाची जबाबदारी घेता ? 

त्या करिता पुन्हा वेगळे टोल घेता.  व्यवस्था काय पुरवता??? नेहमी फक्त जनतेच्या अकलेचे वाभाडे काढता ..ते सोप्पंय नाही का ?  तुमचे चमचे तुमच्या विरुद्ध तोंड कसे उघडणार . आणि प्रश्न विचारण्यास कोणी सरसावला तर त्या चे mike वा तत्सम सोय काढून घ्यायच्या ..

काल पर्यंत गाव कुसातून जाणारे रस्ते गाव फुलवत होते आता दिवे मालवत आहेत.. 

खरंच असल्या योजनांची महाराष्ट्र वा भारताला आता गरज राहिली आहे का ? गेले ते दिवस .... हे जुने झाले सर्व.. विचार करा ..

कारण ह्या लोकांना पैसा आगाऊ लागतो काम मात्र रेंगाळले तरी त्याची फिकीर त्यांना नसते तशी तरतूद ते करून घेतात ..

शहरात ही नको त्या जुनाट मेट्रो च्या योजना आणून नागरिकांना विनाकारण छळायचे सुरू आहे . तसे नसते  तर गरज सरो वैद्य मरो म्हणून पहिली मेट्रो का विक्रीस काढली गेल्याची बातमी झळकली असेल बरे ??? 

विचार करा . जागे व्हा .. यांना फक्त आपल्या बुडा खालची जमीन हवी आहे.. त्यासाठी ते काहीही करतील ..

म्हणून देश वाचवा . भारत जोडा.. आणि यावेळी पक्के मजबूत जोडा कारण अन्य कोणीच त्या विचाराचा वा कुवतीचा की नियतीचा नाहीच... नमस्कार .

🙏🏾

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी