महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा
*वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन कार्यक्रम आणि ग्रह, तारे आणि अवकाश दर्शन*
वृतांत :
दिनांक : 18 ऑगस्ट 2023
*स्थळ : सोफिया कॉलेज, महालक्ष्मी, मुंबई.*
एकूण विद्यार्थिनी 210
महिला प्राध्यापक संख्या 6 ते 7, पुरुष प्राध्यापक 2
*वैज्ञानिक दृष्टीकोन प्रबोधन कार्यक्रम आणि ग्रह तारे आणि अवकाश दर्शन कार्यक्रम म.अंनिसचे सन्माननिय सदस्य माई वंदना शिंदे आणि प्रकाश पारखे सर यांनी सर्वांना खिळवून ठेवत उत्तमरित्या सादर केला.*
पाहुण्यांची ओळख इ. झाल्यानंतर विद्यार्थिनींनी 'अंधश्रद्धा निर्मूलन विषयाची निकड ' विषयावरील पथनाट्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. विविध आजारपणावर लोक अजून ही डॉक्टरकडे न जाता अंधश्रद्धेला बळी पडलेले असल्याचे त्यात दाखवले. उदा. देवी रोग समजून कांजिण्यांवर डॉक्टर कडे न जाता अघोरी बुवाबाबाचे उपाय करतात. प्रसंगी जीवावर बेतू शकते . वेळ नी पैसा वाया जातो ते वेगळेच. म्हणून समाज प्रबोधन व्हायला हवे असा सूर होता. उत्तम हावभाव योग्य संवाद, शब्दफेक, उत्तम लेखन दिग्दर्शन आणि सादरीकरण होऊन उत्तम विषय प्रतिपादन झाल्याने अंनिस ला पर्यायाने माईंना कार्यक्रम सादर करताना खूप प्रतिसाद मिळाला.
....एनएसएस विभाग प्रमुख वैशाली मॅडम यांच्या हस्ते माईंनी चमत्कारातून विज्ञान कार्यक्रमाची पाण्याचा दिवा लावून सुरुवात केली.. शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग समरसून कार्यक्रम पाहत होते प्रतिसाद देत होते, प्रश्न विचारत होते. अनेक चमत्कारांमागील उदा. पाण्याचा दिवा ,खिळा पाट इ.. विज्ञान समजून घेण्याकरीता, सर्वांचे कुतूहल शांत करण्याकरिता सर्वांना शेवटी प्रश्र्नोत्तरांकरिता वेळ देण्यात आला. सर्व आश्चर्याने स्तिमित होऊन करकरण भावाची उजलणी करू लागले होते हेच कार्यक्रमाचे यश.. माईंनी एकूण उपस्थित विद्यार्थिनींची अभ्यासाची भाषा वगैरे कल पाहत चळवळ गीत 'मैं अच्छी हूं घबराउ नक्को ऐसा खत मे लिखो' हे गीत सर्वांच्या साथीने म्हंटले. .सर्वांना खूप आवडले. एवढ्या कालावधित प्रा. प्रकाश सरांनी आपले अवकाश दर्शनाच्या PPT इ. ची जुळवणी केली आणि जुजबी ओळखी नंतर विलोभनीय ग्रह , तारे, नक्षत्र, आकाशगंगा यांची क्रमशः ओळख, त्यांचे आपल्या पासून चे अंतर, त्यांची गती इ विषयावर खूप मनोवेधक माहिती सांगत सर्वांना खिळवून ठेवले.. आपल्या वैज्ञानिकांचे शोध अपार कष्ट आणि विज्ञानाची झेप सर्व, सर्व खूप थक्क करणारे होते. असा हा एकत्रित कार्यक्रम खूप अपुऱ्या म्हणावे इतक्या कमी वेळेत सादर झाला. परंतु हेही नसे थोडके, असा अनुभव सर्वांच्या प्रतिक्रियांवरून मिळाला..शेवटपर्यंत कार्यक्रम खूप उत्साहात सादर झाला. माई आणि प्रकाश सरांचे आभार मानताना एनएसएस प्रमुखांनी कार्यक्रम सर्वांना खूप अवडल्याचा उल्लेख केला. अशा प्रकारे कार्यक्रम ११:३० ते १:३० / २ पर्यंत उत्तम रंगला.
सादरकर्ते : माई वंदना शिंदे आणि प्रा. प्रकाश पारखे सर,
सहकार्य : कार्यकर्त्या पुष्पाताई तापोळे, कार्यकर्त्या प्राचीताई सावंत ( कार्यकर्त्या हेमाताई रामचंद्रन यांच्या सहकार्याने कार्यक्रम झाला)
सर्वांचे खूप खूप आभार 🙏🏾
*महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ठाणे शहर शाखा*
वृतांत: अँब्रोस चेट्टियार 🙏🏾
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा