खात्रीपूर्वक शंका येते.
खात्रीपूर्वक शंका येते.
तुमच्या स्वार्थाला खिंडार पडताना पाहून
तुम्ही बिथरत असाल नाही...?
तुमच्या बुडाखाली कुणी सुरुंग लावताना पाहून
तुम्ही बिथरत असाल नाही...?
तुमच्याच काळ्याकुट्ट कर्तृत्वाला कुणी लाथाडताना पाहून
तुम्ही बिथरत असाल नाही...?
चारचौघात तुमचे कर्म उघडे पाडणाऱ्यास पाहून
तुम्ही बिथरत असाल नाही...?
तुमच्या काळ्याविंद्र्या क्रूर कारस्थानाने कुणाचा काटा काढताना पकडले गेल्यावर
तुम्ही बिथरत असाल नाही...?
तुमच्या कारस्थानाची इथ्यंभूत माहिती कुणी चव्हाट्यावर आणल्यावर
तुम्ही बिथरत असाल नाही...?
अशा कुणा एक वा अनेक सुधारकांचा काटा काढण्याच्या क्रूर योजनेच्या मनस्वी निर्लज्ज आंदोलनांनी चव्हाट्यावर तुम्हीच तुमचे बिंग फोडताना
तुम्ही बिथरत असाल नाही...?
जीवघेण्या जघन्य क्रूर विचारांचे वाहक होऊनही स्वताचे किंचित से नुकसान झाले तरी
तुम्ही बिथरत असाल नाही...?
असे एकामागून एक, मानवतेचे प्राण घेत सुटलेले, जगासमोर तुमचे अपराध पुराव्यानिशी बाहेर आले तर काय होईल? याचा विचार कर करून
तुम्ही बिथरत असाल नाही...?
कुण्या विरोधकास कोणत्या गोळीचा ग्रास बनवायचा याच्या विचारात दिवसेंदिवस त्याच्या मागावर राहून, त्याचे कार्य संपविण्याच्या सुपाऱ्या घेताना कुणाला समजू नये अशा विचाराने
तुम्ही बिथरत असाल नाही...?
*अँब्रोस चेट्टियार*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा