येता श्रावण श्रावण

 


येता श्रावण श्रावण

येता श्रावण श्रावण
दाटे मनात काहूर
बालपण सवंगडी
आठवाची भूणभूण

मन उधाण उधाण
मन भयाण भयाण
घडी रंग बदलते
हिऱ्या कोळशाची खाण
           येता श्रावण श्रावण....

दिस ढळता न ढळे
रात तसूही न हाले
घट्ट काळ्या काळजाचे
रक्त डोळ्यात ओघळे
        येता श्रावण श्रावण....

ते ऐकिवाचे बाल्य
सवंगडी कल्पनेचे
कैक अभागी जिवांचे
कोणी करावे चोचले
          येता श्रावण श्रावण....

राहो आठव तयाची
जाता माहेराच्या वाटी
कूस स्वप्नांची उजवा
सखी पुरवा डोहाळे
           येता श्रावण श्रावण....
      ©अँब्रोस चेट्टियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

माय मराठी

राष्ट्रपिता

राहुल गांधी